आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशी कट्टा घेवून शहरात मिरवणाऱ्या एका तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेवून त्यांच्याकडून देशी कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त केले. ही कारवाई शहरातील काकडदाती ग्रामपंचायतीच्या हद्दीत सांडवा-मांडवा मार्गावर डी.बी. पथकाची पार पाडली. सूरज नरवाडे वय २१ वर्ष रा. काकडदाती असे ताब्यात घेतलेल्या तरूणाचे नाव आहे. पुसद शहरात दिवसेंदिवस देशी कट्टा बाळगून गुन्हे करणारे गुन्हेगार वाढत आहे. त्या अनुषंगाने दोन दिवसांपूर्वीच पोलिस ठाण्यात नव्याने रूजू झालेले ठाणेदार शंकर पांचाळ यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन गुन्हेगारावर आवर घालण्याचे निर्देश दिले होते.
अश्यात डि.बी पथकाला काकडदाती येथे राहणाऱ्या सूरज नरवाडे या तरूणाकडे देशी कट्टा असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यावरून रविवारी सांडवा-मांडवा मार्गावर पोलिसांनी सापळा रचून सूरज नरवाडे या तरुणाकडून ताब्यात घेत त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्याजवळ एक देशी बनावटीचा कट्टा आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी पंकज अतुलकर, ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनात शहर डीबी पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरिक्षक अनिल सावळे, पथकातील प्रफुल्ल इंगोले, गिरीश बेंद्रे, शुध्दोधन भगत, आकाश बाबुळकर, वैजनाथ पवार यांनी पार पाडली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.