आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:अज्ञात वाहनाच्या धडकेतील तरुणीचा‎ उपचारादरम्यान मृत्यू‎

दर्यापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी पोलिस भरतीकरिता धावण्याचा‎ सराव करीत असलेल्या तरुणीला भरधाव वाहनाने‎ धडक दिली. दरम्यान अपघातात गंभीर जखमी‎ झालेल्या तरूणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.‎ दर्यापूर पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून अज्ञात‎ वाहनचालकावर गुन्हा दाखल‎ ‎ केला आहे. दिव्या प्रमोद टापरे‎ ‎ (२१) रा. थिलोरी असे मृतक‎ ‎ तरूणीचे नाव आहे. दिव्या‎ आपल्या मैत्रिणींसोबत पोलिस‎ भरतीच्या सरावाकरिता‎ नेहमीप्रमाणे बुधवारी (दि. ३०)‎ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजेदरम्यान दर्यापूर‎ मुख्य रस्त्याने मॉर्निंग वॉक करण्यासाठी गेली होती.‎

या वेळी भातकुली मार्गाने दर्यापूरकडे भरधाव वेगाने‎ जात असलेल्या एका अज्ञात वाहनाने तिला जबर‎ धडक दिली. या धडकेत ती गंभीर जखमी झाली‎ होती. गंभीर जखमी अवस्थेत तिला अमरावती येथे‎ खाजगी रुग्णालयात उपचारांकरिता दाखल‎ करण्यात आले होते. मात्र गुरूवार (दि. १) रात्री‎ उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. घटनेमुळे गावात‎ सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे‎ गरीब परिस्थितीमुळे मेहनत करून पोलिस सेवेत‎ नोकरी मिळवण्याच्या आशेने तिचे प्रयत्न सुरू होते.‎ मात्र या दुर्दैवी घटनेमुळे तिचे स्वप्न भंग झाले‎ असून, कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...