आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील आष्टा येथील २८ वर्षीय युवकाने घरातच साडीच्या साहाय्याने आड्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार, १२ मार्चलासकाळी ७ वाजताउघडकीस आली.दीपकपुरणलाल सहदेव(वय -२८) रा.आष्टा असे मृतकाचे नाव आहे. दीपकने राहत्या घरी ११ मार्च मध्यरात्री आड्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब रविवारी सकाळी उघडकीस आली. मृतकाच्या वडिलांच्या नावाने ३ एकर शेती असून, त्या शेतीच्या भरवशावर परिवाराचा उदरनिर्वाह दीपक चालवत होता. सततची नापिकीमुळे कर्जाचा बोजा होता.
खासगी फायनान्सचे दीड लाख व एका बँकेचे ५ लाख रुपये कर्ज असल्याने त्याने आत्महत्या केल्याचे नातेवाइकांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. मृतकाच्या पश्चात आई, वडील, पत्नी, १ मुलगी व भाऊ असा आप्त परिवार आहे. या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक धर्मराज सोनुने, उपनिरीक्षक नरेंद्र मानकर, उपनिरीक्षक विनाश जाधव व एएसआय रमेश जाधव करत आहे.
अपघातात पायाला दुखापत झाल्याच्या त्रासापायी कंटाळून एका व्यक्तीने घरीच दरवाजाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील किनवट येथे रविवारी सकाळी उघडकीस आली. गजानन घनश्याम बहादुरे वय ४५ रा. किनवट असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.