आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुलावरून पाण्यात उडी:युवकाची पुलावरून नदीत उडी; सुदैवाने बचावला

दिग्रसएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुसळधार पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या धावंडा नदीच्या पाण्याच्या प्रवाहात शनी मंदिराजवळ असलेल्या “माणुसमाऱ्या” नाव असलेल्या पुलावरून एका युवकाने उडी मारली. काही दूर अंतरावर नदीच्या पात्रातून तो युवक वाहत गेला, मात्र सुदैवाने तो पाण्याबाहेर निघाल्याची घटना सोमवारी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान घडली.दोन दिवसांपासून शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. सोमवारी संततधार पावसामुळे धावंडा नदीला पूर आला होता.

या पुरात एका युवकाने कपडे काढून शनिमंदिराजवळील “माणुसमाऱ्या” पुलावरून पाण्यात उडी घेतली. दोन- तीन किलोमीटर अंतर तो पाण्याच्या प्रवाहात वाहत जाऊन आर्णी नाका परिसरातील पुलाजवळून सुखरूप बाहेर निघाला. ही बाब दिग्रस शहरात वाऱ्यासारखी पसरली. यावेळी नागरिकांची घटनास्थळी बघ्यांची गर्दी उसळली होती. या युवकाने स्वतःचे कपडे माणुसमाऱ्या पुलावर काढून थेट नदी पत्रात उडी मारल्याची सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...