आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघटना एकवटल्या:पालिका मुख्याधिकाऱ्यांची बदली रद्द करा ; आमदार मदन येरावारांची घेतली भेट

यवतमाळ15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालिकेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक माधुरी मडावी यांची तडकाफडकी बदली करण्याची शिफारस शासन स्तरावर करण्यात आल्याची माहिती आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे. पालिका मुख्याधिकार्‍यांची बदली करु नये अशी मागणी आदिवासी समाज बांधवांनी केली आहे. रविवार, दि. ११ सप्टेंबर रोजी आदिवासी समाजबांधवांनी आमदार मदन येरावार यांची भेट घेतली.

यवतमाळ पालिकेच्या इतिहासात पहिला महिला आदिवासी समाजाच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी स्वकर्तृत्वाने पुढे आल्या आहे. त्याना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार मिळाला आहे. शहर स्वच्छ व सुदंर करण्यासाठी त्यांनी कामगिरी महत्वाची आहे. एक कर्तबगार अधिकारी म्हणून त्यांची जनमानसात ओळख आहे. असे असतानाही त्यांची बदली करण्याचे प्रयत्न लोकप्रतिनिधींकडून होत आहे. तशी शिफारस झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुख्याधिकारी मडावी यांची बदली होऊ देऊ नये अशी मागणी आदिवासी समाजबांधवांनी आमदार मदन येरावार यांच्याकडे केली आहे. यावेळी ऑल इंडिया एम्प्लॉइज फेडरेशनचे अध्यक्ष प्रा. ह.मा.धुर्वे, सुरेंद्र कन्नाके, राजू चांदेकर, धर्मराज चांदेकर, प्रा.निनाद सुरपाम यांचेसह आदिवासी समाज संघटनेच्या विविध संघटनांचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...