आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आंबट’:लोणचे बनवण्यासाठी गृहिणींची लगबग ; कैऱ्यांच्या किमतीत गतवर्षीच्या तुलनेत वाढ; गावरान कैरी ‘आंबट’

खामगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या शहरातील बाजारात मोठ्या प्रमाणात कैऱ्या विक्रीस आल्या आहेत. या कैऱ्यांच्या किमती गतवर्षीच्या तुलनेत वाढल्या आहेत. असे असताना सुद्धा लोणचे तयार करण्यासाठी गृहिणींकडून लगबग सुरु असून, घरोघरी चटकदार कैरीच्या लोणच्याचा सुवास दरवळत आहे. मात्र, गावरान कैरी आंबट झाल्याने इतर आंब्याकडे गृहिणींचा कल वाढलेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कैरी व त्यासाठी लागणाऱ्या मसाल्याच्या किमतीत वाढ झाल्याने चटकदार लोणच्याला महागाईची झळ बसली आहे. मान्सून पूर्व पावसाच्या वादळी वाऱ्यामुळे अनेक भागात कैऱ्या गळून पडल्या आहेत. त्यामुळे लोणच्याची कैरी दुरापास्त होऊन त्याची आवक अजूनही बाजारात मंदावलेली आहे. मात्र, कालांतराने डेरेदार वृक्षांच्या सावलीखाली शेतीचे उत्पादन कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आंब्याच्या झाडावर कुऱ्हाड घातली गेली. त्यामुळे परिसरातील आमराई नष्ट झाल्याचा परिणामी, ग्रामीण भागातील घराघरात लोणच्याचा घमघमाट कमी झाला. सध्या बोटावर मोजण्या इतक्याच शेतकऱ्यांकडे गावरान आंब्याची झाडे दिसून येत आहेत. वातावरणात बदल तसेच अवकाळी मुळे बहुतांश आंब्याच्या मोहरा वर परिणाम झाला होता. यामुळे गावरान आंब्याची गोड चव आंबट झाली आहे.

लोणच्यासाठी खिशाला कात्री गृहिणींकडून लोणचे तयार करण्याची लगबग सध्या सुरु असून त्यासाठी लागणाऱ्या गावरान कैरीची जागा आता इतर आंब्याच्या कैऱ्यांनी घेतली आहे. लोणचे तयार करण्यासाठी लागणारा गरम मसाल्याचे भाव वाढल्याने लोणचे तयार करण्यासाठी खिशाला कात्री लागत आहे.

बातम्या आणखी आहेत...