आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला तीन वर्षानंतर अटक करण्यात दिग्रस पोलिसांना यश आले. ही कारवाई तालुक्यातील वरंदळी येथे रविवारी रात्री करण्यात आली. युवराज माधव जाधव (३५) रा. वरंदळी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तीन वर्षांपूर्वी युवराज जाधव याने एका शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला चढवला होता. या प्रकरणी त्याच्यावर भादंवि कलम ३५३, ५०६ नुसार गंभीर गुन्ह्याची नोंद होती. अनेक वेळा त्याला न्यायालयाने समन्स पाठवले होते. तो फरार असल्याने न्यायालयात हजर होत नसल्याने दारव्हा न्यायालयाने अटक वॉरंट जारी केला होता. तो वरंदळी येथे आपल्या घरी आल्याची पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून दिग्रस पोलिस निरीक्षक धर्मराज सोनुने, उपनिरीक्षक नरेंद्र मानकर , ढाले यांच्यासह पोलिसांनी सापळा रचून त्याला घरातून ताब्यात घेऊन त्याला जेरबंद केले. तीन वर्षापासून फरार आरोपीला पकडून जेरबंद केल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.