आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल‎:अल्पवयीन मुलीवर‎ अत्याचार, आरोपीला‎ दहा वर्षांची शिक्षा‎

यवतमाळ‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या‎ आरोपीला न्यायालयाने दहा वर्षाची शिक्षा सुनावली. हा‎ निर्णय शनिवार, दि. ४ मार्चला अतिरिक्त सत्र‎ न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश एस. डब्ल्यू. चव्हाण‎ यांनी ठोठावला. मनिष तराळे वय ३३ वर्ष रा. शिवणी‎ असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.‎ या प्रकरणी प्राप्त माहितीनूसार, कळंब तालुक्यातील‎ एका अल्पवयीन मुलीला दि. २२ फेब्रुवारी २०१८ च्या‎ आधी एका वर्षापासून मनिष तराळे हा शेतात नेवून‎ लैंगिक अत्याचार करीत होता. दि. २८ जानेवारी २०१८‎ रोजी मनिष तराळे याने त्या अल्पवयीन मुलीला शेतात‎ बोलावून धमकी देत लैंगिक अत्याचार केला होता.

या‎ प्रकरणी पिडीत मुलीने दि. २२ फेब्रुवारी २०१८ रोजी‎ कळंब पोलिस ठाणे गाठून रितसर तक्रार नोंद केली.‎ घटनेचे गांभीर्य लक्षात घेता कळंब पोलिसांनी विविध‎ कलमान्वये गुन्हे नोंदवून आरोपी मनिष तराळे याला‎ अटक केली. दरम्यान तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक‎ एस. एन. भगत यांनी तपास पूर्ण करीत प्रकरण‎ न्यायप्रविष्ट केले. सदर प्रकरण अतिरिक्त सत्र‎ न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश एस. डब्ल्यू. चव्हाण‎ यांच्या न्यायालयात सुनावणीला आले. या प्रकरणी‎ न्यायालयाने तीन साक्षीदार तपासले, ज्यामध्ये पिडीत‎ मुलगी, वैद्यकीय अधिकारी आणि तपास‎ अधिकाऱ्यांची साक्ष महत्वाची ठरली. त्यावरून‎ न्यायालयाने मनिष तराळे याला दहा वर्षाची शिक्षा‎ आणि दंड ठोठावला.‎

बातम्या आणखी आहेत...