आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:सोयरीकीसाठी जाणाऱ्या भंडारी येथील वाहनाला विठोली फाट्याजवळ अपघात ; वाहनातील 14 जणांपैकी 5 गंभीर जखनी, तर 9 किरकोळ जखमी

आर्णीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सोयरीकीच्या कार्यक्रमासाठी जात असलेल्या परिवाराच्या वाहनाला अपघात होऊन त्यात वाहनातील १४ जणांपैकी ५ जण गंभीर जखमी झाले. ही घटना तालुक्यातील बोरगाव दाभडी मार्गावर असलेल्या विठोळी फाट्याजवळ बुधवार, २५ मे रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. तालुक्यातील भंडारी (ज) येथे राहणाऱ्या मुलाचा परिवार सोयरीकीच्या कार्यक्रमासाठी शिवर भंडारीला जात होते. मॅक्सीमो वाहनामध्ये या परिवारातील सदस्य आणि नातेवाईक असे एकुण १४ जण होते. त्याचे वाहन बोरगाव दाभडी रस्तावर विठोळी फाट्याजवळ आले असता अचानक वाहन पलटी होऊन अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच परिसरात असलेल्या नागरिकांनी आणि इतर प्रवाशांनी वाहनातील जखमींना बाहेर काढुन उपचारासाठी आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना केले. या अपघातात वाहनातील १४ प्रवाशांपैकी चालक दीपक लक्ष्मण सोळंके रा. भंडारी (ज), सीता किसन शिंदे रा. भंडारी (ज), आरुषी सुनील साळुंके रा. परसोडा, लिलाबाई धर्मा सोळंके रा. परसोडा, मनोज लिंबा शिंदे रा. भंडारी (ज) असे पाच प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करुन त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले. तर बाकीचे ९ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे. जखमी प्रवासींना ग्रामीण रुग्णालय आर्णी येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच आर्णी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तर दुसरीकडे सोयरीकीसाठी जाणारे वाहन पलटी झाल्याचे समजताच जखमीच्या नातेवाइकांनी आर्णी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. त्यामुळे रुग्णालय परिसरात एकाचवेळी मोठी गर्दी जमली होती. वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणात कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

बातम्या आणखी आहेत...