आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भीषण अपघात:झारखंडकडे मजूर घेऊन जाणाऱ्या एसटीचा अपघात, चालकासह 3 मजुरांचा मृत्यू, 22 मजूर जखमी

यवतमाळएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एसटीने यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीजवळ उभ्या टिप्परला दिली धडक

सोलापूरवरून मजूर घेऊन झारखंडकडे निघालेली एसटी बसची उभ्या टिप्परला धडक लागली. यात एसटी च्या चालकासह ३ मजुरांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आर्णी तालुक्यातील कोळवन गावाजवळ मंगळवार, दि. १९ मे रोजी पहाटे ४. ३० वाजता घडली. 

अनुज मांगीकर, सुनीता साडू, सोनू सिंग, तिघेही रा. झारखंड, तर एसटी चालक शिंदे, रा. सोलापूर, असे मृतकाचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी सोलापूरवरून २२  ते २५ मजूर घेऊन एसटी बस क्रमांक इमएच - १४ बीटी- ४६५१ झारखंडकडे निघाली होती. अशात मंगळवारी पहाटे आर्णी तालुक्यातील कोळवन गावाजवळ उभा टिप्पर क्रमांक टीएस ०७ उए  २६०८ वर एसटी बसने धडक दिली. 

अपघात एवढा भीषण होता की, एसटीचा समोरील भाग चेंदामेंदा झाला. यात चालकाचा तसेच ३ मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर जवळपास २२ मजूर जखमी आहेत. यातील काही जखमी वर आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे, तर काही गंभीर मजुरांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे आणण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूच्या नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली.  मृतकाचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...