आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहनाला भीषण अपघात:डॉक्टरच्या वाहनाला अपघात

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ येथील प्रख्यात मानसिक रोग तज्ञ डॉ. पियुष बरलोटा व त्यांच्या मित्रांचे कुटुंब हैद्राबाद येथून यवतमाळकडे परत येताना वाहनाला भीषण अपघात झाला. त्यात वाहनात बसुन असलेल्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुरेखा बरलोटा याचा मृत्यु झाला. याव्यतिरिक्त अन्य तिघे जखमी झाले. मंगळवार दि. १ नोव्हेंबर रोजी दुपारी घडलेल्या या घटनेची माहिती शहरात येताच सर्वत्र शोककळा पसरली होती.

निर्मल ते हैद्राबाद मार्गावर निर्मल पासून १२ किलोमीटर अंतरावर त्यांच्या चारचाकी वाहनाचे टायर अचानक फुटले. त्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले आहे. एमएच २९ बीपी ४२०० या क्रमांकाच्या त्याच्या वाहनाचा अपघात झाला. डॉ. बरलोटा यांच्या पत्नी डॉ. सुरेखा बरलोटा यांचा घटनास्थळीच मृत्यु झाला. पुजा पीयूष बरलोटा (१६) तसेच अतिथी (१८) आणि मीनल (४०) असे तिघेजण निर्मल रुग्णालयात उपचार घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...