आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:तिथीनुसार शिवजयंती निमित्त‎ विविध कार्यक्रमाचे आयोजन‎

यवतमाळ22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती‎ शिवाजी महाराज यांची तिथीनुसार ३९३ वी जयंती‎ फाल्गुन वद्य तृतीया म्हणजेच शुक्रवार, दि. १० मार्च‎ रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.‎ दरवर्षीप्रमाणे शिवजयंती उत्सव समिती शिवाजी चौक‎ माळीपुरा यांच्याद्वारे या शिव जयंतीचे औचित्य साधून‎ विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.‎ या शिवजयंती निमित्त आयोजित सर्व कार्यक्रमांमध्ये‎ सर्व शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे‎ आवाहन शिवजयंती उत्सव समितीचे चंद्रकांत‎ गड्डमवार, अजय मुंदडा, मनोज औदार्य, पराग पिंगळे,‎ राजेंद्र गायकवाड, संतोष ढवळे, प्रशांत यादव, नितीन‎ मिर्झापुरे, डॉ. सतपाल सोवळे, राम साकळे, राजू‎ पडगिलवार, देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे,‎ दिलीप मादेशवार, सुरज गुप्ता, राजेंद्र डांगे, राकेश‎ मिश्रा, अर्जुन खर्चे, आदींनी केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...