आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चतुर्थ श्रेणी:जॉबचार्टनुसारच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना काम सांगावे

यवतमाळ9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी (परिचर) यांना जॉब चार्ट नुसार कामे सांगावे, असे आदेश शासनाच्या एका पत्रान्वये देण्यात आले आहे. या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करून अहवाल शासनस्तरावर सादर करावा, अशा सुचना पत्राच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत.

जिल्हा परिषद अंतर्गत चतूर्थश्रेणी (परिचर) कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामाव्यतिरिक्त इतरही कामं सांगण्यात येत आहे. यात प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचरांना ओपीडीच्या चिठ्ठ्या काढणे, ऑपरेशन थेटरमध्ये ड्रम लावणे, फेविगेशन करणे, इतर तांत्रीक कामे, आवारातील गवत काढणे, जिल्हा परिषदेत स्वच्छतागृह साफ, पशूवैद्यकीय रुग्णालयात हमाली, सफाई कामगारांची कामे परिचरांच्या माथी मारल्या जात आहे. यासंदर्भात लेखी आदेश नाहीत. तरीसुद्धा वरिष्ठांकडून बेकायदेशीररीत्या कामे करून घेतल्या जात आहे.

बातम्या आणखी आहेत...