आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावसंतनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गल्ली क्र. दोनमधील अल्पवयीन शाळकरी मुलीच्या अपहरण झाले होते. या अपहरण प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून, दबावात असलेल्या पीडिताने तिची आपबीती पुसद न्यायालयाच्या न्यायाधीशांसमोर सांगितली. त्यावरून वसंतनगर पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल केला असून, न्यायालयाने आरोपीला पोलिस कोठडी सुनावली आहे.
मोईन खान (२२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. १९ जानेवारी रोजी शाळेत जाते म्हणून घरून निघालेली अल्पवयीन मुलगी घरी परतलीच नाही. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून वसंतनगर पोलिस ठाण्यात अज्ञात घटनेत आरोपीवर भादंवी ३६३ अन्वये गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला. दरम्यान, बेपत्ता मुलगी २० जानेवारीचे रात्री उशीरा मिळून आली.
सुरूवातीला तिने कुणावरही आक्षेप घेतला नव्हता. तिच्या वागण्यावरून ती दबावाखाली असल्याचे पोलिसांना वाटतं होते. त्यामुळे तिला विश्वासात घेऊन तिचा थेट न्यायालयात जबाब घेतला गेला. तिने सांगितलेले वास्तव धक्कादायक होते. तिला पळवून नेऊन लैंगिक अत्याचार केला असल्याबाबतचा जवाब तीने न्यायालयात दिला.
त्यामुळे गंभीर वळण घेणाऱ्या या प्रकरणी ३६३ व्यतिरिक्त ३७६ (२), ३७६ (३), ३२३, ५०६,पोक्सो ४, ६, ८, १२ कलमांचा समावेश करण्यात आला. दरम्यान शहरातील मोईनला दि. ९ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी ठोठावली आहे. ठाणेदार प्रवीण नाचणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक संतोष मातोंडकर यांनी आरोपीला हैदराबाद येथून बोलावून घेतले हे विशेष. बेपत्ता मुलगी मिळून आली त्याच्या दुसऱ्या दिवशी पुसदमध्ये लव्ह जिहाद विरोधात मोर्चा होणार होता. या प्रकरणात पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.