आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोठडी:खून प्रकरणातील आरोपींना 4 दिवस कोठडी

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अवैध दारू विक्रीला विरोध करणाऱ्या ४५ वर्षीय युवक अरूण राठोड याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. ही धक्कादायक घटना पुसद तालुक्यातील गायमुख नगर येथे गुरूवार घडली असून या प्रकरणी सहा मारेकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. शुक्रवारी या सहा मारेकऱ्यांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

शिवाजी चव्हाण वय ४० वर्ष, सचिन चव्हाण वय १९ वर्ष, राम राठोड वय २९ वर्ष, राजू चव्हाण वय ४३ वर्ष, लक्ष्मीबाई चव्हाण वय ४० वर्ष आणि वंदना चव्हाण वय ३८ वर्ष सर्व रा. गायमुख नगर, पुसद अशी त्या सहा जणांची नावे आहे.

पुसद तालुक्यातील गायमुख नगर येथील अरूण राठोड याच्या घरा शेजारी राहणाऱ्या चव्हाण कुटुंबीयांच्या दारू विक्रीला अरूण याने विरोध केला होता. गुरूवारी पहाटे सहा जणांनी मिळून अरूण याची धारदार शस्त्राने वार करीत निर्घृण हत्या केली. या प्रकरणी बळीराम राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून वसंतनगर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...