आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकलीवर अत्याचार:चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस आजीवन कारावासाची शिक्षा; घटनेनंतर २ महिन्यांत न्यायालयाचा निकाल, आर्णी तालुक्यातील घटना

दारव्हा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आर्णी तालुक्यात घडलेल्या या घटनेसंदर्भात जलदगती न्यायालयात चालविण्यात आलेल्या खटल्यामुळे ही घटना घडुन २ महिने पुर्ण होण्याच्या पुर्वीच प्रकरण निकाली निघाले. येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश ह. ल. मनवर यांनी आरोपीवर दोष सिद्ध झाल्याने गुरूवार दि. ११ मे रोजी दुपारी हा निर्णय दिला.

संजय उर्फ मुक्या मोहन जाधव वय २४ रा. बोरगाव ता. आर्णी असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. आर्णी तालुक्यात एका गावामध्ये घरात असलेली मुलगी एकटी असल्याचे पाहुन आरोपी संजयने चॉकलेटचे आमीश दाखवुन तीच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तीला ५ रुपये देवुन याबाबत कुणालाही सांगु नको अशी धमकी दिली. १३ मार्च २०२२ रोजी दुपारी ही घटना घडली. यावेळी पीडितेची आई कामावर होती ती घरी परतल्यावर तीला पीडित मुलीच्या कपड्यावर रक्ताचे डाग दिसताच तीची विचारपूस केली. त्यावर पीडीत मुलीने सर्व आपबीती सांगितली. त्यावरुन तिच्या आईने मुलीला सोबत घेवुन थेट आर्णी पोलीस स्टेशन गाठून तक्रार केली. पोलिसांनी आरोपीस अटक केली. त्यानंतर तातडीने तपास पुर्ण करुन आरोपीविरोधात न्यायाधीश ह. ल. मनवर यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

या खटल्यात वैद्यकीय अहवाल व डी. एन. ए. रिपोर्ट महत्वाचे ठरले. सरकारी पक्षाने १२ साक्षीदार सादर केले. त्यापैकी पीडित, पीडिताची आई व वैद्यकीय तपासणी करणारे डॉक्टर यांची साक्ष महत्त्वाची ठरली. उपविभागीय पोलिस अधिकारी आदित्य मिलखेलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल आडे यांच्या मार्गदर्शनात आर्णी पोलीस निरीक्षक पीतांबर जाधव यांनी केलेला तपास आणि सरकारी पक्षातर्फे अॅड. नीती दवे यंाचा युक्तिवाद महत्वाचा ठरला.

बातम्या आणखी आहेत...