आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयीन:अल्पवयीन मुलीचा विनयभंगप्रकरणी आरोपीला तीन वर्षांची सुनावली शिक्षा; अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल

यवतमाळएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

​​​​अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने तीन वर्षाची शिक्षा सुनावली. हा निर्णय गुरूवार, दि. २३जुनला अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश यांना ठोठावला. मंगेश पखाले वय ३४ वर्ष रा. बेलोरा, यवतमाळ असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणी प्राप्त माहितीनूसार, यवतमाळ तालुक्यातील बेलोरा येथील मंगेश पखाले याने दि. ३० जून २०२० रोजी एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करीत धमकी दिली होती. या प्रकरणी पिडीत अल्पवयीन मुलीने कुटुंबीयांसह ग्रामीण पोलिस ठाणे गाठून रितसर तक्रार दिली. या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेता ग्रामीण पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे नोंदवून मंगेश पखाले याला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणाचा संपूर्ण तपास ग्रामीण पोलिस ठाण्यातील तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक गजानन करेवाड यांनी पूर्ण करीत प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते.

सदर प्रकरण अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश एस. डब्ल्यू. चव्हाण यांच्या न्यायालयात सुनावणीला आले. यावेळी न्यायालयाने चार साक्षीदार तपासले.

ज्यात पिडीत अल्पवयीन मुलगी आणि तिच्या बहिणीची साक्ष महत्वाची ठरली. त्यावरून न्यायालयाने आरोपी मंगेश पखाले याला तीन वर्षाची शिक्षा आणि तीन हजार रूपयांचा दंड ठोठावला. या प्रकरणी फिर्यादी पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील तथा अति शासकीय अभियोक्ता अॅड. संदिप दर्डा यांनी बाजू मांडली. तर पैरवी अधिकारी म्हणून फौजदार विलास चातारकर यांनी सहकार्य केले.