आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक महिला‎ दिन:जनुना ग्रामपंचायतच्या वतीने‎ कर्तृत्ववान महिलांचा सत्कार‎

खामगाव17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक महिला‎ दिनानिमित्त जनुना ग्रामपंचायतच्या‎ सरपंच सुवर्णा संदिप गोरे यांनी‎ बुधवार, दि.८ मार्च रोजी जनुना‎ गावातील पाच कर्तृत्ववान‎ महिलांचा सत्कार करण्यात आला.‎ तालुक्यांतील जनुना ग्रामपंचायत‎ सरपंच सुवर्णा गोरे यांनी सरपंच‎ पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी‎ गावातील विवीध विकास कामांना‎ प्राधान्य दिले आहे. गावातील‎ महिला विकासासाठी समोर आल्या‎ तर विकासात्मक बदल घडू शकतो.‎ त्या नेहमीच गावात सामजिक‎ कामात अग्रेसर असतात. जागतिक‎ महिला दिनानिमित्त सरपंच सुवर्णा‎ गोरे यांनी मानधनातून साडीचोळी‎ करीता महिलांना एक हजार‎ रुपयांचा धनादेश देवून त्यांचा‎ सत्कार करण्यात आला. यावेळी‎ लक्ष्मीबाई हरमकार, राधाबाई‎ हरमकार, नलिनी कळमकार,‎ सुनीता शेजव, जाकेराबी शेख‎ युसूफ यांचा सत्कार करण्यात‎ आला. यावेळी महिला मोठ्या‎ संख्येने उपस्थित होत्या.‎

बातम्या आणखी आहेत...