आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:शासकीय कार्यालयासमोर विनाहेल्मेट 19 कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

यवतमाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे मंगळवार, ५ एप्रिलपासून शासकीय कार्यालयासमोर विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई सुरू करण्यात आली. आरटीओ, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद कार्यालयापुढे एकाच वेळी कारवाई करत हेल्मेट न वापरणाऱ्या १९ दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच विनाहेल्मेटचा पाचशे रुपये दंड आकारण्यात आला.

शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसह कामानिमित्त शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांनी तरी किमान वाहतूक नियमांचे पालन करावे व हेल्मेटचा वापर करावा, अशी संकल्पना परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांची आहे. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी व वाहन चालकांच्या सुरक्षेकरिता हेल्मेट घालणे व वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. सध्या जिल्ह्यात एकूण वाहनांच्या तुलनेत ८० टक्के दुचाकी आहेत. जिल्ह्यात २०२१ मध्ये झालेल्या अपघातांपैकी दुचाकीच्या अपघातांची संख्या ५० ते ५५ टक्के होती. त्यात डोक्याला मार लागून मृत्यू झालेल्या दुचाकीस्वारांचे प्रमाण सर्वाधिक आहे. याच कारणामुळे जिल्ह्यात दुचाकीस्वारांना हेल्मेट घालणे सक्तीचे करण्यात आले आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी शासकीय कार्यालयापुढे हेल्मेट तपासणी मोहीम राबवण्यास मंगळवारपासून सुरुवात केली. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात ११, जिल्हा परिषद ५, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ३ अशा १९ विनाहेल्मेट कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच पाचशे रुपये दंड आकारण्यात आला. आता सर्व शासकीय कार्यालयासमोर मोहीम राबवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

शासकीय कार्यालयासमोर मोहीम राबवणार : आरटीओ, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद कार्यालयापुढे हेल्मेट तपासणी करण्यात आल्यानंतर आता पोलिस अधीक्षक कार्यालय, नगरपालिका, शासकीय कार्यालयांपुढे मोहीम राबवण्यात येणार असल्याचे आरटीओ ज्ञानेश्वर हिरडे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...