आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:सलग तिसऱ्या दिवशी रेतीघाटांवर कारवाई; वठोली घाटावर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची धडक

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील रेतीघाटांवर सुरू असलेल्या अवैध प्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या निर्देशावरून अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद सिंह दुबे यांनी धडक कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. सलग तिसऱ्या दिवशीही करण्यात आलेल्या कारवाईमुळे रेती घाट धारकांचे आणि रेतीतस्करांचे धाबे दणाणले आहेत. त्यातच शुक्रवार दि. १३ मे रोजी झरी तालुक्यातील वठोडी रेती घाटावर कारवाई करण्यात आली आहे.

काही रेतीघाटांवरुन नियमबाह्य पद्धतीने रेती उपसा सुरू असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी यांना प्राप्त झाल्या होत्या. त्यावरुन जिल्हाधिकारी यांनी अप्पर जिल्हाधिकारी यांना कारवाईचे निर्देश दिले. त्यावरुन अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद सिंह दुबे यांनी शुक्रवारी दुपारी थेट झरी तालुक्यातील वठोली रेती घाटावर धडक दिली. यावेळी रेती उपसा करण्यासाठी जेसीबीचा वापर होत असलेला दिसुन आला. त्यामुळे त्यांनी थेट उपविभागीय पोलिस अधिकारी वणी आणि तहसीलदार वणी यांना रेती घाटावर पाचारण केले. त्यानंतर कारवाई करण्याचे निर्देश तहसीलदार यांना दिले. रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे.

बातम्या आणखी आहेत...