आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:अवैध रेतीच्या दोन वाहनांवर कारवाई ; हायवा व टिप्पर रेती वाहतुक करीत असल्याचे निदर्शनास आले

महागावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अवैध रेती वाहतुक करणाऱ्या दोन वाहनांवर उपविभागीय अधिकारी यांनी कारवाई केली आहे.उमरखेड उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड हे महागाव तालुक्यात दौऱ्यावर असतांना कासोळा येथे रस्त्यावर क्रमांक एमएच ०४ डीके २३८७, एमएच ३७ टी ६५३४ या क्रमांकाचे एक हायवा व टिप्पर रेती वाहतुक करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ही दोन्ही वाहने अडवून रॉयल्टी संदर्भात विचारणा केली असता दोन्ही वाहनांच्या चालकांनी त्यांना रॉयल्टी ची पावती दिली. त्याची पाहणी केली असता दोन्ही पावत्या ह्या जुन्या व खोड तोड केलेल्या असल्याचे आढळुन आल्याने त्यांनी दोन्ही वाहने जप्त करून कारवाई केली. त्यानंतर ही वाहने महागाव तहसील कार्यालयात पाठविण्यात आली. अचानक करण्यात आलेल्या या कारवाईने रेती तस्करी करणाऱ्यांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले आहेत.

बातम्या आणखी आहेत...