आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुटखा विक्री करणाऱ्यांना पायबंद:वाशीम जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई

वाशीमएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

समाजात शांतता व सुव्यवस्था राहावी त्याचबरोबर अवैध धंद्यांवर प्रतिबंध व्हावा यासाठी वाशीम जिल्हा पोलीस दलातर्फे सतत कारवाया सुरु असतात. त्याच पार्श्वभूमीवर वाशीम जिल्ह्यात अवैधरीत्या गुटखा विक्री करणाऱ्यांना पायबंद घालण्याकरिता जिल्ह्यात विशेष मोहीम राबवण्यात आली.त्या अनुषंगाने दि. ३० रोजी अपर पोलिस अधीक्षकांच्या पथकाने महाराष्ट्र शासनाकडून प्रतिबंधित असलेल्या वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा वाशिम शहर पोलिस ठाणे हद्दीत ३९,३९५ रुपयांचा गुटखा जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कामरगाव येथे ६०,९८१ रुपयांचा गुटखा जप्त केला.

शिरपूर पोलिस ठाणे अंतर्गत चांडस येथे १,२४,८०० रुपयांचा गुटखा जप्त केला. मंगरूळपीर पोलिस ठाणे अंतर्गत कोष्टीपुरा येथे ३३,३०० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून मानोरा पोलिस ठाणे अंतर्गत शेंदोना येथे दोन कारवायांमध्ये ४,११२ रुपयांचा गुटखा जप्त करून अवैध गुटखा विक्री संबंधाने ६ ठिकाणी धडक कारवाई करून २ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत ६ आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली. तसेच सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात, प्रतिबंध व व्यापार वाणिज्य, उत्पादन, पुरवठा व वितरण यांचे विनियमन) कायदा २००३ कायद्यान्वये एकूण २५ केसेस करून पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. २०२२ मध्ये संपूर्ण जिल्ह्यात आजपावतो अवैध गुटखा विक्री संबंधाने एकूण ६० आरोपितांवर अवैध गुटखा विक्री संबंधाने गुन्हे नोंदवून त्यांच्याकडून २ कोटी १९ लाख रुपयांचा गुटखा जप्त करून कारवाई करण्यात आली आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक तसेच सर्व पोलिस ठाण्याच्या पथकांनी कामगिरी बजावली आहे.

बातम्या आणखी आहेत...