आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध दारू अड्डा:शहरातील दोघांवर कारवाई, जवळपास तीन लाखाचा मुद्देमाल जप्त

यवतमाळ9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील अवैध गावठी दारू अड्ड‌यावर एलसीबी पथकाने धाड टाकून दोघांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई गुरूवार, दि. २४ नोव्हेंबरला शहरातील विविध ठिकाणी करण्यात आली असून जवळपास तीन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रमजान छोटु उचे वय ४५ वर्ष रा. जवाई नगर आणि खन्नु पिरू रायलीवाले वय ५० वर्ष रा. गवळीपूरा, यवतमाळ अशी गुन्हे नोंद करण्यात आलेल्या दोघांची नावे आहे.

गुरूवारी शहरातील तलाव फैल परिसरातील मोठ्या प्रमाणात गावठी दारू काढण्यात येत असल्याची माहिती एलसीबी पथकाला मिळाली. त्यावरून सकाळच्या सुमारास पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी धाड टाकली. यावेळी रमजान उचे हा दडगाची चुल रचून त्यावर लोखंडी ड्रम ठेवून हातभट्टी दारू काढतांना आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेत ५० लिटर गावठी दारू, १ हजार ४०० लिटर मोहा सडवा आणि साहित्य असा एकूण २ लाख ९४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोघांवर विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी प्रमुख पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी, सहायक पोलिस निरीक्षक विवेक देशमुख, पथकातील बंडु डांगे, अजय डोळे, महेश नाईक, रजनीकांत मडावी यांनी पार पाडली.

बातम्या आणखी आहेत...