आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूरग्रस्त गावांत मोफत आरोग्य तपासणी:रोटरी क्लब, डॉक्टर्स असोसिएशन व क्रांती युवा संघटनेचा उपक्रम

मारेगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणी, डॉक्टर्स असोसिएशन तसेच क्रांती युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने वणी मारेगाव तालुक्यातील पूरग्रस्त गावांत मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप शिबीरे घेण्यात येत आहे. या शिबिरात पशू चिकित्सक सुद्धा उपलब्ध असून यात जनावरांची तपासणी व औषध दिल्या जात आहे. या उपक्रमाचा पूरग्रस्त गावात स्वागत केल्या जात असुन या शिबिराचा हजारो नागरिक लाभ घेत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून चालु असलेल्या संततधार पावसाने मारेगाव तालुक्यातील नदी नाल्या काठावरील अनेक गावांत पुराचे पाणी शिरले तर हजारो हेक्टर वरील शेतजमिनी पाण्याखाली आल्याने अतोनात नुकसान झाले. यात मारेगाव तालुक्यातील वनोजादेवी, आपटी, सावंगी, कोसारा, शिवणी धोबे, आदी अनेक गावात पूरपरिस्थिती मुळे जनजीवन विस्कळीत झाले. यामुळे एक हात मदतीचा म्हणून रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणी व डॉक्टर्स असोसिएशन तसेच क्रांती युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील पूरग्रस्त गावांत मोफत आरोग्य शिबिरे घेण्यात येत आहे. तसेच या शिबिरात जनावरांचे सुद्धा तपासणी करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून मारेगाव तालुक्यातील वनोजादेवी, आपटी या गावात सुद्धा मोफत शिबिरे घेण्यात आली. यावेळी वनोजादेवी येथील सरपंच धांडे, आपटी येथील सातपुते, डॉ. महेंद्र लोढा, राकेश खुराणा, डॉ. राणे, डॉ. अग्रवाल, डॉ. चौधरी, डॉ. धीरज डाहुले, डीमन टोंगे, अंकुश माफुर, बंडू टोंगे, आशिष आगबतलवार,अश्विनी महाकुलकर, नेहा ठाकरे, प्रेम पडोळे, धीरज डांगाले, प्रशांत भंडारी, सुधाकर धांडे, धनराज दातारकर आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...