आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरपंचाने दिला पूरग्रस्तांना मदतीचा हात:उपक्रम कुंभा येथील सरपंच अरविंद ठाकरे यांचे वनोजादेवी, आपटी, सावंगी गावात किराणा किट वाटप

मारेगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या वीस दिवसापासून होत असलेल्या संततधार पावसाने नदी नाल्या काठावरील मार्डी कुंभा विभागातील हजारो हेक्टरच्या वर शेत जमिनी पाण्याखाली आली. तसेच अनेक गावात पुराचे पाणी चक्क घरात शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होवुन जनजीवनच विस्कळीत झाले. पूरग्रस्तांना एक हात मदतीचा म्हणून कुंभा येथील सरपंच अरविंद ठाकरे यांनी वनोजादेवी, आपटी, सावंगी आदी गावातील गरजवंत पूरग्रस्तांच्या कुटुंबाला भेट देवुन त्यांना दिलासा दिला. त्यांना तात्पुरती मदत म्हणून पंधरा दिवस पुरेल असे अन्न- धान्य किराणा किटचे वाटप केले.

सुरू असलेल्या संततधार पावसाने पाण्याची पातळी चांगलीच वाढल्याने अखेर वर्धा, बेंबळा प्रकल्पाचे पाणी सोडावे लागल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली. यामुळे मारेगाव तालुक्यातील मार्डी,कुंभा,वनोजादेवी विभागातील वर्धा नदी व लहान मोठया नाल्यांना महापूर आला. त्यात नदी नाल्या काठावरील शेतजमीन पाण्याखाली आल्या तर पुराचे पाणी थेट गावात शिरल्याने अतोनात नुकसान झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले.मात्र यावर प्रशासना सह राजकीय नेते पूरग्रस्तांना कुठलीही मदत न करता राजकीय नेत्यां कडुन केवळ निवेदने देवून समाधान व्यक्त करत बघ्याची भूमिका घेत असताना, कुंभा येथील सरपंच अरविंद ठाकरे हे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी समोर आले.व तालुक्यातील वनोजादेवी, आपटी, सावंगी आदी गावांत भेट देवून नुकसानग्रस्त कुटुंबाला एक हात मदतीचा म्हणून पंधरा दिवस पुरेल असे अन्न धान्य किराणा किटचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.तसेच आपटी येथे दोन ट्रॅक्टर जनावरांना चारा देण्याचे आश्वासन सुद्धा दिले.

यावेळी रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे अॅड. देवीदास काळे, अरविंद ठाकरे, सुनील वरारकर, बर्डे, डीमन टोंगे, अजय आसुटकर, आपटी येथील सरपंच सातपुते आदी उपस्थित होते. या उपक्रमासाठी गोवर्धन टोंगे, मयुर ठाकरे, गजानन ठाकरे, मारोती मुपीडवार, संदीप डुकरे, सुरेश घोटेकर, वैभव डुकरे, राकेश ठाकरे, आदींनी परिश्रम घेतले. कुंभा येथील सरपंच अरविंद ठाकरे यांनी मागील वर्षी हजारो किलोमीटर वर असलेले कोल्हापूर, मिरज, सांगली परिसरातील गावात पूरग्रस्तांना सुद्धा स्वखर्चाने अन्न धान्य किराणा व जीवनावश्यक वस्तूच्या किटचा ट्रक पाठवून त्यांनाही मदतीचा हात दिला होता. तसेच लॉक डाऊन मध्ये सुद्धा शेकडो गरजू मजुरांना किराणा किट व आर्थिक मदत केली. तसेच कुंभा परिसरातील रुग्ण सेवे करिता रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याने व लोकांच्या मदतीसाठी कधीही धावुन जात असल्याने सरपंच अरविंद ठाकरे यांनी परिसरात आपल्या नावाची वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

बातम्या आणखी आहेत...