आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष:आदर्श बोरी महाल रस्त्याची झाली चाळणी; पुढाऱ्यांचा नाकर्तेपणा, कळंब तालुक्यातील प्रकार

कळंब17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळंब तालुक्यातील आदर्श बोरी महाल गावात जाणाऱ्या डांबर रोडची जन प्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे चाळणी झाली असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरुन ठोकरा खात रस्ता पार करावा लागत आहे.

कळंब तालुक्यातील राळेगाव रोडवर आदर्श बोरी महाल गांव असून स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा असलेले ग्राम आहे. या गावाच्या सरपंचपदी असलेली महिला भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या तालुका सरचिटणीस आहे. मात्र त्यांच्याच गावात नागरिकांना बसस्थानक पासुन ३ किमी जातांना ठोकरा खात चालावे लागत आहे. यासंदर्भात बोरी महाल ग्रामपंचायतीच्या सरपंच वैष्णवी चिमूरकर यांना विचारले असता, दि. १३ ऑक्टोबर २०२१ रोजी जिल्हा परिषद बांधकाम विभाग उपअभियंता यांना बोरी महाल चौफुली ते गावामध्ये जाणारा ३ कि. मी. रस्ता दुरुस्ती करण्यात यावी, यासाठी पत्रव्यवहार केला आहे.

परंतु या मतदार संघाचे आमदार डॉ. अशोक उईके यांना सुध्दा रस्ता दुरुस्तीसाठी निधी मिळावा म्हणून वेळोवेळी लक्षात आणून दिले. जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. यामुळे रस्त्याने जाणे येणे करणाऱ्या नागरिकांचे बे हाल होत आहे. या रोडने साधे दुचाकी वाहन नेतांना डोंगळ, मांडी खड्डे चुकवताना बरेच नागरिक रात्रीच्या वेळी खड्ड्यात पडून अपघात झाले आहे.

सदर रस्त्यामुळे एखाद्याच्या जीवावर बेतण्याचा प्रसंग उध्दभवू शकतो. शासनाने व जन प्रतिनिधींनी लक्ष देऊन बसस्थानक ते बोरी महाल गावात जाणारा ३ किमी रस्ता दुरुस्ती करुन द्यावा, अशी बोरी महाल येथील नागरिकांची मागणी आहे.

बातम्या आणखी आहेत...