आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव:स्वातंत्र्यपूर्व काळापासून विराजमान आदर्श गणेशोत्सव मंडऴ

सुरेंद्र मिश्रा | दिग्रस24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोपर्यंत सार्वजनिक गणपतीची स्थापना करणार नाही तो पर्यंत केस कर्तन करणार नाही. एका स्वतंत्रता सेनानीच्या अशा संकल्पनेतून येथील होलटेक पुरा परिसरामध्ये ७९ वर्षांपूर्वी गणपती मंडळाची स्थापना झाली. त्या स्वतंत्रता सेनानीचे नाव आहे बालाजी पंत नालमवार.

जहाल मतवादी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनासाठी देशाच्या जनतेला संघटित करण्याच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक गणेश उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यांच्या या संकल्पनेला व्यापक असा प्रतिसाद मिळाले. त्यांच्या या अभियानामध्ये दिग्रस परिसराचाही मोलाचा वाटा होता. वेगवेगळ्या पातळीवर स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये आपले योगदान देणारे अनेक सेनानी येथेही कार्यरत होते. त्या पैकी एक होते बालाजी नालामवार. स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये त्यांचा सहभाग होता. त्यामुळे इंग्रजी राजवटीच्या रडारवर त्यांचे नाव होते.

अशातच सार्वजनिक गणेश उत्सव ची स्थापना करण्यासाठी ठिकठिकाणी हालचाली होत होत्या. अशा वेळी बालाजी नालमवार यांनी दिग्रस मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरविले आणि १९४२ मध्ये ज्या वेळेस गणेशोत्सव सुरू होणार होते. त्या वेळेस गणपतीची स्थापना करण्यासाठी बालाजी नालमवार आणि त्यांचे सहकारी मित्र गणपती आणावयास गेले होते. त्यापूर्वी बालाजी नालमवार यांनी क्विट इंडिया मूव्हमेंट अर्थात भारत छोडो आंदोलन मध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे इंग्रजी प्रशासन त्यांच्या पाळत ठेऊन होते.

जेव्हा बालाजी नालमवार गणपती आणावयास गेले होते तेथेच पोलिसांनी त्यांना पकडले आणि कोठडीत रवानगी केली. अशा परिस्थितीमध्ये १९४२ मध्ये स्थापित होणारे सार्वजनिक गणेशोत्सव होऊ शकले नाही. तेव्हा बालाजी पंत यांनी शपथ घेतली होती की, जोपर्यंत सार्वजनिक गणपतीची स्थापना करणार नाही तोपर्यंत डोक्याचे केस आणि दाढीचे केस कापणार नाही. पुढे त्यांना इंग्रजांनी दहा महिन्याची शिक्षा ठोठावली. यवतमाळ कारागृहात दोन महिने आणि जबलपूर येथील सेंट्रल जेलमध्ये आठ महिने ठेवण्यात आले होते. सुटका झाल्या नंतर १९४३ मध्ये नालमवार यांनी आदर्श गणेश उत्सव मंडळाची स्थापना केली.

यापुढेही मंडळाचे काम असेच सुरू राहील सध्या या गणेश मंडळामध्ये बालाजी पंत नालमवार यांचे चिरंजीव प्रकाश नालामवार हे सदस्य आहे. तर सखाराम तुंडलवार अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत आहेत. तर मंडळामध्ये प्रा. प्रभाकर दळवी, सुभाष डगवाल, अरुण सुकोडे, गणेश शिरभाते, सखाराम कुंडलवार, विजय संकला, संतोष संकला, हरित संकला, बाबुलाल वाजा, भिकुबाई वाजा, अॅड. सुनील व्यवहारे, संतोष शर्मा, गोविंद शर्मा, गिरीश दळवी असे नाव जुळत गेले आहे. मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवले जातात. विविध शिबिरे घेतली जातात. पुढे ही मंडळाचे काम असेच सुरू राहील आणि दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरे केले जाईल असे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...