आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाचे रुग्ण रोज वाढत असल्याचे दिसते. शुक्रवारी सर्वाधिक रुग्ण दारव्हा तालुक्यात आढळून आले. शुक्रवारी २४ तासांत नव्या २१ कोरोना रुग्णांची भर पडली. विशेष म्हणजे त्यापैकी ७ रुग्ण एकट्या दारव्हा तालुक्यात आढळून आले. सातत्याने वाढत असलेल्या या रुग्णांमुळे अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या १०५ वर जावून पोहोचली आहे.
विविध देशांमध्ये कोरोनाची चौथी लाट सुरू आहे. जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या अद्याप नियंत्रणात आहे. मात्र तरीही दरदिवशी आढळून येणारे रुग्ण हळूहळू वाढत आहेत. सातत्याने वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण प्रशासनासाठी डोकेदुखी ठरणार आहेत. त्यामुळे आता प्रशासनाकडूनही त्यासंदर्भात आढावा घेत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यातच गेल्या २४ तासांत जिल्ह्यात २१ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. याच दिवसभरात १३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या १०५ झाली आहे. जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात करण्यात आलेल्या कोरोना तपासणींपैकी एकूण ५१२ जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी २१ अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित ४९१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बाभुळगाव तालुक्यातील दोन, दारव्हा सात, घाटंजी पाच, नेर एक, पांढरकवडा एक, राळेगाव तीन, यवतमाळ २ रूग्ण असून त्यात १० महिला व ११ पुरूषांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७९५२६ आहे. तर आतापर्यंत एकुण ७७६०५ जण बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण १८०३ मृत्यूची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर ८.८९ असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर ४.१० आहे तर मृत्यूदर २.२७ आहे.
त्रिसुत्री पाळण्याचे प्रशासनाचे आवाहन
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांनी कोरोना त्रिसूत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचा पहिला, दुसरा व तीसरा डोज घेवून संपुर्ण लसीकरण करावे व स्वत:ला सुरक्षीत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.