आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिकिट:अॅडव्हान्स बुकिंग करून हंगामी तिकिटांची वाढीव दरात विक्री

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कुठलाही सण उत्सव असो पुणे-मुंबई येथून यवतमाळला येण्यासाठी वा परत जाण्यासाठी असलेल्या ट्रॅव्हल्सचे दर वाढलेलेच असतात. या उत्सवांच्या काळात आधीपासुनच अॅडव्हान्स बुकिंग करुन ठेवुन त्या तिकीट एैन हंगामात चढ्या भावाने विक्री करण्याचा नवा फंडा काही लोकांनी सुरू केला आहे. त्यामुळे कुठला सण-उत्सव असो त्यानिमित्त घरी येणाऱ्या नागरिकांना मात्र ट्रॅव्हल्सच्या या वाढलेल्या दरांचा फटका सहन करावा लागतो.

सण उत्सवाला सुट्यांचे नियोजन पाहुन अनेकजण घरी येतात. यवतमाळ येथे रेल्वे सुविधा नसल्याने बरेचजण ट्रॅव्हल्सचा पर्याय निवडतात. ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात अतिरिक्त पैसा घेवुन हे अॅडव्हान्स बुकिंग करणारे मोठी कमाई करीत आहे. त्यामुळे या गंभीर बाबीकडे लक्ष देवुन ट्रॅव्हल्स युनियन आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग यांनी तोडगा काढणे गरजेचे आहे.

राेज २० ते ३० ट्रॅव्हल्स
यवतमाळ येथून पुणे-मुंबईसाठी दरदिवशी १२ ते १५ ट्रॅव्हल्स जातात. याव्यतिरिक्त नागपुर, चंद्रपुर या ठिकाणांवरुन येणाऱ्या आणि यवतमाळ मार्गे महानगरांकडे जाणाऱ्या १० ते १२ ट्रॅव्हल्स दरदिवशी जातात. याच प्रमाणात ट्रॅव्हल्स परतही येतात. मात्र सण-उत्सव काळात या ट्रॅव्हल्सची संख्या सुमारे दुप्पट होते.

ऑनलाइनमुळे मोठ्या अडचणी
ऑनलाइन बुकिंग होत असल्याने कोण प्रवासी आणि किती भाडे घेतले याची माहिती आम्हालाही नसते. त्यातुनच असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे प्रवाशांनी अधिकृत कार्यालयात जावुनच तिकीट घ्यायला हवी, ऑनलाइन बुकिंग करतेवेळी लक्षात ठेवावे की, एसटी महामंडळाच्या तिकीट दरापेक्षा दीड पट पर्यंत भाडे आकारण्याचा नियम आहे. त्यापेक्षा जास्त दर द्यावे लागत असतील तर त्याची तक्रार संबंधीत ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात करु शकतो. बाबा जयस्वाल, कार्याध्यक्ष, यवतमाळ ट्रॅव्हल्स असोसीएशन

बातम्या आणखी आहेत...