आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:40 वर्षांनंतर दिघोरीला मिळाली ग्रामपंचायत

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ आणि दारव्हा तालुक्याच्या सीमेवर असलेले दिघोरी, वरुड गावाला ४० वर्षांपासून ग्रामपंचायत अस्तित्वात नव्हती. परिणामी, गावे विकासापासून कोसो दूर होते. गावाला हक्काची ग्रामपंचायत मिळावी यासाठी गावातील पुरूषोत्तम राठोड तसेच नागरिकांनी गेल्या ८ वर्षांपासून प्रयत्न केले. विविध अडथळ्याचा सामना करावा लागला, परंतु राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्नाने ४० वर्षानंतर गावाला हक्काची ग्रामपंचायत मिळाली.

स्वातंत्र काळानंतर जिल्ह्यातील मोझर, इजारा, वरुड, दिघोरी अशी तीन गावे मिळून ग्रामपंचायत तयार करण्यात आली होती. गावातील नागरिक मतदानाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीवर सदस्य निवडणूक देत होती, परंतू सन १९८२-८३ मध्ये जिल्ह्यातील तालुक्याची पुनर्रचना करण्यात आली. त्यामध्ये मोझर गाव दारव्हा तालुक्यात आले. दिघोरी, वरुड इजारा हे दोन्ही गावांचा समावेश यवतमाळ तालुक्यात झाला. मूळ मोझर ग्रामपंचायत दारव्हा तालुक्यात गेल्याने दिघोरी आणि वरुड इजारा गावाला ग्रामपंचायत मधून काढण्यात आले. तद्नंतर शासकीय योजनेपासून दिघोरी, वरुड इजारा गाव सन १९८३ पासून वंचित राहत आहे. कुठल्याही स्वरूपाचे विकासात्मक कामे नसल्याने गाव विकासापासून दूर आहे.

सन २०११ च्या जनगणनेवरून दिघोरी गावाची लोकसंख्या ८०१, तर वरुड इजारा गावाची लोकसंख्या ४८५ वर पोहोचली आहे. शासन एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. तर ह्या दोन्ही गावातील नागरिकांना ४० वर्षापासून मतदानाचा हक्क बजावता आला नसल्याचे स्पष्ट झाले. अशात गावातील पुरुषोत्तम राठोड, गावातील नागरिकांनी गावात ग्रामपंचायत व्हावी, गावाचा विकास व्हावा याकरिता आठ वर्षांपासून प्रयत्न केले आहे. तर मंत्रालयात सुद्धा वारंवार चकरा मारल्या. अनेक अडथळे येत होते. शेवटी पालकमंत्री संजय राठोड आणि गावातील पुरुषोत्तम राठोड यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना भेटून दिघोरी, वरुड इजारा गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत मंजूर केली. त्यानंतर जिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना आदेशावरून गावात लवकरच ग्रामपंचायत निर्माण होणार आहे.

पालकमंत्र्यांचा ग्रामस्थांकडून सत्कार
यवतमाळ तालुक्यातील दिघोरी येथे श्री बळीराम महाराज यांची अमृतवाणी सुरू आहे. श्री सेवालाल बापू चरित्र वाचन उत्साह सोहळ्याला पालकमंत्री संजय राठोड यांनी भेट शुक्रवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी भेट दिली. त्यावेळी ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांचा सत्कार केला.

बातम्या आणखी आहेत...