आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपसरपंचांची एन्ट्री:आठवड्यानंतर ग्रा.पं. त होणार उपसरपंचांची एन्ट्री

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा सरपंचाची निवड थेट मतदारांमधून करण्यात आली आहे. आता उपसरपंच निवड होणार असून, ह्याकरीता १० ते १२, ह्या तीन दिवसात सभा बोलावता येणार आहे. या सभेत सदस्यांच्या मतदानातून उपसरपंचाची निवड केली जाणार आहे. यात जिल्हाभरातील एकूण ७२ उपसरपंचाचा सहभाग आहे.

जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतीच्या ४६१ सदस्यांसाठी १९ सप्टेंबर रोजी मतदान प्रक्रीया पार पडली. तत्पूर्वी शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार सरपंचाची निवड थेट मतदारांमधूनच करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रीया लोटून पंधरा दिवसांचा कालावधी लोटल्या गेला आहे, परंतू अद्याप पर्यंत उपसरपंचाची निवड करण्यात आलीच नव्हती.

शेवटी उपसरपंच निवडीच्या दृष्टीने ग्रामविकास विभागाने आदेश निर्गमित केले आहे. या आदेशानुसार उपसरपंच निवडीच्या दृष्टीने सभा बोलावण्यासाठी तीन दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. ही सभा टप्प्या-टप्प्याने १० ते १२ ऑक्टोबर ह्या तीन दिवसांच्या कालावधीत बोलावण्याचे निश्चित झाले आहे. त्या अनुषंगाने यवतमाळ तालुक्यातील तीन, बाभूळगाव, महागाव प्रत्येकी एक, कळंब दोन, आर्णी ४, घाटंजी ६, केळापूर २५, मारेगाव ११, झरी जामणी ८ आणि राळेगाव ११, अशा मिळून एकुण ७२ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. या ग्रामपंचायतीत उपसरपंच निवड होईल.

याकरता ग्रामपंचायत सदस्य मतदान करणार असून, समप्रमाणात मते पडल्यास निर्णायक मतदान करण्याचा अधिकार सरपंचाला आहे. एकंदरीत उपसरपंच निवडीनंतर खऱ्या अर्थाने ग्रामपंचायतीच्या कामकाजाला सुरूवात होईल.

बातम्या आणखी आहेत...