आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

19 मंडळात अतिवृष्टी:पंधरा दिवसानंतर जोरदार बरसला; जिल्ह्यातील पिकांना नवसंजीवनी

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर जिल्ह्यात मागील पंधरा दिवसापासून पाऊस पडत नसल्याने कपाशी, सोयाबीन ही पिके अडचणीत सापडली होती. शनिवारी रात्रीपासून दडी मारलेल्या पावसाला सुरुवात झाली. रविवार, ४ सप्टेंबर रोजी दुपारपर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावल्याने हजारो हेक्टरवरील खरिपातील पिकांना जीवनदान मिळाले आहे.

जून महिना जवळपास कोरडंठाक गेला. सुरूवातीला तुरळक प्रमाणात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या पेरण्यांचे प्रमाण फार कमी होते. मात्र त्यानंतर जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांत पावसाने जिल्ह्यात हाहाकार केला. अतिवृष्टी व पुराच्या पाण्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले. पीक हातातून जाईल, अशी भीती शेतकऱ्यांना होती. पावसाने उसंत घेतल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. सध्य:स्थितीत जिल्ह्यात पिकांची स्थिती चांगली आहे. परंतू गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने जोमात असलेली खरिपातील पिके वाळू लागली होती. त्यामुळे शेतकरी पुन्हा पावसाकडे डोळे लावून बसले होते. अशास्थितीत शनिवारी रात्रीपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील साडेचार लाख हेक्टरवरील पीके बाधित झाली आहेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी ५३८ कोटी रुपयांची गरज आहे.

बातम्या आणखी आहेत...