आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:तुळशी विवाहनंतर होणार लग्नाचा धुमधडाका

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीची धामधूम आटोपली असून स्थळ बघण्यास वधू-वर पित्यांनी सुरुवात केली आहे. अनुरुप व आपल्या पसंतीचे स्थळांना पसंती मिळाल्यानंतर तारखा काढण्यासाठी ज्येष्ठ मंडळी आता सरसावू लागली असून तुळशीच्या लग्नानंतरच विवाहाचे शुभ मुहुर्त सापडणार आहे. तंज्ञाच्या मार्गदर्शनानुसार ग्रहांची अनुकूल स्थिती बघता एकुण ५७ मुहुर्त यंदाच्या शुभ विवाहा करता निश्चित करण्यात आले आहे. एप्रिल वगळता सर्वच महिन्यात लग्नाचे मुहुर्त तज्ज्ञांनी शोधुन काढले आहेत.शनिवार, ५ नोव्हेंबर पासुन तुळशी विवाहाला सुरुवात होत आहे. ८ नोव्हेंबर रोजी तुळशी विवाहाची सांगता होणार आहे.

त्यानंतर पहिलाच लग्नाचा मुहुर्त २६ नोव्हेंबर रोजी आहे. यंदा कोणतेही निर्बंध नसल्याने मुक्त वातावरणात वर वधू हजारोंच्या उपस्थितीत बोहल्यावर चढणार आहे. जून २०२३ पर्यंत लग्नाचे शुभ मुहुर्त असल्याने वधू-वर आपल्या सोयीने व आपले आर्थिक बजेट बसवित तारखा निश्चित करणार आहेत. दाट तिथी ज्या तारखेला येतील त्याची दखल घेत मंगल कार्यालय, कॅटरर्स, बॅडवाले, उत्सवासारखाच घोडेवाले, वाहने बुकिंग करण्याचे मागे वधू व वराकडील मंडळी लागणार आहे.

लग्नाचे मुहुर्त म्हणजे बाजारामध्ये मोठी उलाढाल होण्यास सुरुवात होते. कपडे, सोने खरेदी मोठया प्रमाणात होते. फर्निचर, भांडे खरेदीलाही लोकांची गर्दी लागते. इलेक्ट्रॉनिक वस्तूंचीही खरेदीत वाढ होते. हा मौसमच खऱ्या अर्थाने बाजाराला चैतन्य रूप देणारा ठरतो. सण, उत्सवा प्रमाणेच लग्नही मोठया साजरा सुखःदुखःचा दोन कुटुंबांना मिळवणारा दुवा असतो.

हिंदू परंपरेनुसार तारखा
हिंदू परंपरेनुसार पंचांग बघुन तज्ज्ञ लोक शुभ मुहुर्ताच्या तारखा काढतात. काही लोक तारखेनुसार नव्हे तर स्वतःच्या सवडीनुसार लग्र समारंभ आटोपून घेतात. असे काही विवाह सध्या पार करणारा पडत आहेत. हिंदु परंपरेनुसार तुळशी विवाहानंतर लग्नाचे बार उडतात. आता ज्याचा अभ्यास आहे तो सुध्दा पंचांग बघुन तारखा काढुन देतो. फक्त अभ्यास असणे गरजेचे आहे. गुरु, मंगळ, चंद्र, शुक्र आदी ग्रहांची केली जाते.

यंदाचे मुहुर्त
नोव्हेंबर २६, २७, २८, २९, डिसेंबर २, ४, ९, १४, १६, १७, १८, जानेवारी १८, २६, २७, ३१. फेब्रुवारी ६, ७, १०, ११, १४, १६, २२, २३, २४, २७, २८ मार्च ८, ९, १३, १७, १८, मे २, ३, ४, ७,८, १९, ११, १२, १३, १५, १६, २१, २२, २९, ३० जुन १,३, ७, ८, ११, १२, १३, १४, २३, २६, २७, २८

बातम्या आणखी आहेत...