आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 कोटींची उलाढाल:दोन वर्षांनी अक्षय तृतीयेला सोन्याला आली झळाळी; सुटीच्या दिवशीही बाजारपेठ सुरू

यवतमाळ22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीमुळे अक्षय तृतीयेला सोन्याच्या खरेदीचा अनेकांचा मुहुर्त हुकला होता. त्यामुळे या दिवशी सुवर्ण बाजारपेठेत होणारी उलाढाल ठप्प होती. मात्र यंदा दोन वर्षाच्या ब्रेकनंतर आलेल्या अक्षय तृतीयेला सोन्याच्या खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली. त्यामुळे अक्षय तृतीयेला सोन्याला झळाळी मिळाल्याचे दिसून आले.

मागील दोन वर्षे कोरोना संसर्ग, लॉकडाऊन, मंदावलेली अर्थ गती या साऱ्या पार्श्वभूमीवर सोने खरेदीचा खास मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेला ग्राहकांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली होती. मात्र तब्बल दोन वर्षानंतर अक्षय्य तृतीयाेला सोने खरेदीसाठी सकाळपासूनच ग्राहकांनी दुकानांमध्ये गर्दी केल्याचे दिसून आले. त्यामुळे अक्षय्य तृतीया सोन्याला झळाळी देणारी ठरल्याचे मत सराफांनी व्यक्त केले आहे. यंदा सोन्याच्या भावामध्ये वाढ होवून सोने ५२ हजारांवर जावून पोहोचले होते. अक्षय तृतीयेच्या सोने खरेदीमुळे जिल्ह्यात सुमारे २ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती सराफा असोसिएशनच्या वतीने देण्यात आली. या खरेदीमुळे व्यावसायिकांना दिलासा मिळाला.

उन्हाचा फटका : सोने खरेदी करण्यासाठी सकाळपासुन ग्राहकांनी सराफा बाजारात गर्दी केली होती. एरव्ही दर मंगळवारी बंद राहणारी सराफा बाजारपेठ अक्षय तृतीयेसाठी मंगळवारी देखील सुरू होती. मात्र दुपारी १ वाजता नंतर वाढलेल्या उन्हामुळे ग्राहकांची गर्दी एकदम ओसरली होती. सायंकाळी ५ पुन्हा गर्दी वाढण्यास सुरूवात झाली.

बातम्या आणखी आहेत...