आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील काही दिवसांपासून राज्यातील भाजप नेते समाजसुधारक आणि महापुरुषांबद्दल अपमानजनक वक्तव्य करत आहे. यामुळे शहरातील पुरोगामी संघटना आक्रमक झाल्या आहेत. रविवार, ११ डिसेंबरला बसस्थानक चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ शहरातील पुरोगामी संघटनांनी महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा निषेध करत त्यांच्या फोटोला जोडे मारत निषेध नोंदवला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर चालणारे हे भाजप नेते व राज्यपाल कोश्यारी देशात पुरोगामी विचारसरणीच्या महापुरुषांबद्दल आकसपूर्ण द्वेष भावनेतून हेतुपुरस्सरपणे बेताल वक्तव्य करत महापुरुषांचा अवमान करत असून, देशात समता, बंधुता व पुरोगामी विचारधारा पाळणाऱ्या नागरिकांची भावना भडकावून, दलित, मराठा, अल्पसंख्याक, आदिवासींद्वारे ज्या महापुरुषांचा आदर्श पाळला जातो अशा महापुरुषांचा अवमान करून मतांचे ध्रुवीकरण करत राजकारणातून सत्ताकारण केले जात असल्याचा आरोप करण्यात आला.
महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करत अवमान करणारे महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी, सुधांशू त्रिवेदी व चंद्रकांत पाटील यांचा जाहीर निषेध करून आंदोलन करण्यात आले. या दरम्यान आंदोलनकर्त्यांनी राज्यपाल कोश्यारी, सुधांशू त्रिवेदी व चंद्रकांत पाटील यांच्या फोटोला जोडे मारून संताप व्यक्त केला. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, वंचित बहुजन आघाडी, आप, बामसेफ, ज्योतिबा दीनबंधू कल्याण मंडळ, सावित्रीबाई फुले महिला मंडळ, भीम टायगर सेना, भारिप बहुजन महासंघ, बसपा, जमात ए इस्लामी हिंद, ऑल इंडिया कौमी तंजिम, स्मृती पर्व प्रतिष्ठान, क्रांतीसूर्य माळी युवा मंडळ, सत्यशोधक समाज, ओबीसी सेल, आंबेडकरी कला साहित्य अकादमीसह यवतमाळातील समस्त पुरोगामी विचारांच्या संघटना सहभागी झाल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.