आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:वाढत्या महागाईविरोधात शहरातील बसस्थानक चौकात आंदोलन; केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

यवतमाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात उडालेला महागाईचा भडका, गगणाला भिडलेल्या पेट्रोल, डिझेल तसेच गॅसच्या किमंती, यासह अन्य दरवाढीच्या विरोधात युवासेना आक्रमक झाली आहे. रविवार, दि. ३ एप्रिलला शहरातील बसस्थानक चौकात युवासेनेने महागाई विरोधात थाळीनाद केला.

केवळ इंधन दरवाढ झाली नाही तर इतर वस्तूंच्या दरात मोठी वाढ झाली आहे. खाद्यतेल, मोबाईल फोनचे रिचार्ज, एटीएममधून पैसे काढण्याच्या प्रक्रियेतही अधिक पैशांची कपात होत आहे. पेट्रोल, डिझेल, इंधन तसेच खाद्य तेलाचे दर तर गगणाला भिडले आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य लोकांनी जगायचे कसे? असा सवाल युवासेनेने उपस्थित केला. सातत्याने होत असलेल्या दरवाढीचा निषेध नोंदवण्यासाठी युवासेनेने आंदोलन केले. केंद्र शासनाच्या धोरणाचा निषेध युवासेनेेने केला. केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे सामान्य नागरिकांना महागाईची झळ बसत असल्याचा आरोप युवासेना पदाधिकार्‍यांनी केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड, पराग पिंगळे, नितीन बांगर, युवासेनेचे विशाल गणात्रा, गिरीजानंद कळंबे, भूषण काटकर, नीलेश बेलोकार, श्रीकांत मिरासे, अभिनव वाटगुरे, पवन शेद्रे, निमीषा पोपट, हितेश खालपाडा, आकाश चव्हाण, पवन अराठे, तुषार देशमुख, नीलेश साबळे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...