आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमरण उपोषण:चुकीचा फेरफार घेऊन शेतजमीन हडपली; सुकळी (ज.) येथील शेतकऱ्याचे उपोषण सुरू

उमरखेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

परंपरागत वारसा हक्काच्या शेतीचा चुकीचा फेरफार करून संबंधित व्यक्तीने तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांशी संगनमत करून जमीन हडपली. या प्रकरणाची निःपक्ष चौकशी करून संबंधितांविरुद्ध कारवाई करावी व हडपलेली जमीन परत मिळवून द्यावी, या मागणीसाठी सुकळी (ज) येथील शेतकरी प्रभाकर वानखेडे यांनी गुरुवार, १ सप्टेंबरपासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

उमरखेड तालुक्यातील सुकळी (ज) येथील रहिवाशी असलेले शेतकरी प्रभाकर वानखेडे यांचे सुकळी शिवारात सर्व्हे नं. १६४ मध्ये ८.५९ हेक्टर आर वडिलोपार्जित शेत आहे. या शेतीचा संबंधित व्यक्तीकडून आर्थिक तडजोडीतून संबंधित तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी केलेल्या खोट्या फेरफारमध्ये केवळ २.५६ हेक्टर आर जमिन दाखवून उर्वरित जमिन हडप केली असल्याचा आरोप उपोषणकर्ते प्रभाकर वानखेडे यांनी केला. सदर फेरफार रद्द करून माझ्या मालकीची शेतजमीन मला परत मिळवून द्यावी, या मागणीसाठी उमरखेड उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

बातम्या आणखी आहेत...