आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:कृषी विभागामार्फत कृषी प्रक्रिया प्रतिपूर्ती सप्ताह‎

बाभूळगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुका कृषी अधिकारी कार्यालय‎ यांच्या वतीने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न‎ प्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत कृषी‎ प्रक्रिया प्रतिपूर्ती सप्ताहाचे आयोजन‎ कार्याशाळे अंतर्गत करण्यात आले.‎

या कार्यशाळेत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न‎ प्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत‎ समाविष्ट उद्योग व्यवसाय जसे कि,‎ दालमिल, बेकरी उद्योग, पोहा निर्मिती,‎ पिठाची गिरणी, शेंगदाणा तेलनिर्मिती,‎ मध निर्मिती, पापड उद्योग शेवया‎ उद्योग, आलू चिप्स उद्योग, हळद व‎ मसाले निर्मिती उद्योग इत्यादींबाबत‎ मार्गदर्शन करण्यात आले.‎ या उद्योगांकरिता शासनामार्फत ३५‎ टक्के किंवा जास्तीत जास्त अनुदान‎ मर्यादा १० लक्ष असेल तसेच सर्व‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ प्रकाराने बँक कर्जाशी निगडीत‎ असणार वरील नमूद व्यवसायांपैकी‎ कोणताही व्यवसाय अस्तित्वात‎ असेल तर त्या व्यवसायाचे‎ विस्तारीकरण करण्यासाठी अर्ज‎ सादर करता येईल.

या सर्व बाबींकरिता‎ लाभार्थी हिस्सा हा एकूण भाग‎ भांडवलाच्या १० टक्के असावा असे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ तालुका कृषी अधिकारी सुरेश गावंडे‎ यांनी आपले मार्गदर्शनात सांगितले.‎ या नाविन्यपूर्ण व्यवसाय सुरू‎ करण्यासाठी किंवा चालू व्यवसायाचे‎ विस्तारीकरण करण्यासाठी वैयक्तिक‎ लाभार्थी हा शेतकरी गट, वैयक्तिक,‎ महिला, शेतकरी उत्पादक कंपनी,‎ बेरोजगार युवक, तसेच भूमिहीन‎ असला तरी चालेल, या कार्यशाळेचे‎ अध्यक्षस्थानी तालुका कृषी‎ अधिकारी सुरेश गावंडे होते व तसेच‎ प्रमुख उपस्थितांमध्ये जिल्हा‎ अधीक्षक कृषी अधिकारी‎ कार्यालयातील देवानंद खांदवे, बागडे,‎ अहिर, गाडगे मॅडम (जिल्हा संसाधन‎ व्यक्ती) तसेच भारतीय स्टेट बँकेचे‎ उप-शाखा व्यवस्थापक देशमुख व‎ बँक ऑफ इंडियाचे शाखा‎ व्यवस्थापक एस.पी. सरदार व‎ तालुक्यातील सर्व कृषी सहाय्यक,‎ कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी‎ अधिकारी, शेतकरी गट, महिला बचत‎ गट, उमेद गट प्रतिनिधी उपस्थित होते.‎ सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन‎ घाटे बी.टी.एम.(आत्मा) व समस्तांचे‎ आभार प्रदर्शन तालुका कृषी‎ अधिकारी सुरेश गावंडे यांनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...