आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआर्णी तालुक्यातील देवगाव प्रकल्पाच्या लोणी उपकालव्याची तब्बल १५ वर्षांपासून दुरुस्ती न केल्यामुळे लोणी व गणगाव या गावातील लाभ क्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील लाभा पासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. खरीप हंगामात अतिवृष्टीच्या फटक्याने शेतकरी हवालदिल झाला. खरीप हंगामातील पिक हातून गेल्याने नव्या उमेदीने रब्बी हंगामात हरभरा व गहू पिकाची पेरणी केली. पण प्रकल्प विभागाच्या दुर्लक्षित पणामुळे लोणी उपकालव्याची दुरुस्ती न केल्याने गणगाव शेत शिवारातील मायनरच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणीच न पोहोचल्याने या शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कोरडवाहू शेती ओलिताखाली आणण्यासाठी ३५ वर्षांपूर्वी देवगाव सिंचन प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पाची सिंचन क्षमता १ हजार ८१६ हेक्टर क्षेत्र इतकी आहे. मात्र प्रत्यक्षात १ हजार ३३४ हेक्टर क्षेत्रात सिंचन होत आहे. मुख्य कालवा आणि उप वितरिका जीर्ण झाल्याने सिंचन क्षमता कमी झाली आहे. लोणी कालव्याची दुरुस्ती न केल्यामुळे झाडे झुडपे वाढली आहे. त्यामुळे मायनरच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणीच पोहचत नसल्याने १५ दिवसाआधी पेरणी केलेल्या त्या पिकाला पाहिले ही पाणी न पोहचल्यामुळे, वन्य प्राण्यांकडून पेरलेल्या हरभरा पिकाची जमीन उकरून नासाडी केली जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.