आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात अहिल्याबाई होळकर जयंती साजरी

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वसंतराव नाईक कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, येथे मंगळवार, दि. ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एन. डी. पार्लावार, प्रा. अंजली गहरवार, प्रा धीरज वसुले, रासेयो कार्यक्रम अधिकारी मंगेश शेटे, सहायक कुलसचिव, डॉ. रवींद्र सातभाई, डॉ. प्रशांत शिंगोटे, डॉ. संदेश बांगर यांचे उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

डॉ. पार्लावार यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. अहिल्याबाई होळकर यांनी निजामशाही, मोगलशाही, आदिलशाही तसेच कुतुबशाही यांना शह दिला होता. अहिल्याबाई होळकर एक बहादूर योध्दा, प्रभावशाली प्रशासक, राजनीतिज्ञ तसेच माळवा प्रांतांच्या जहागीरदार म्हणू ओळखल्या जात असत. मल्हारराव होळकर यांनी अहिल्याबाईला राज्यकारभार प्रशासकीय याच्या कामात पारंगत केले होते. अहिल्याबाई होळकर स्वतः सैन्याचे नेतृत्व करित असत. त्यांनी तीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी अनेक मंदिरे, नदया, गावे, धर्मशाळा, तलाव, विहिरी, पाणपोई, अशी अनेक समाजोपयोगी कामे केली.

तसेच त्यांनी संस्कृतीचा वारसा जपून साम्राज्यातील गोरगरीब जनतेच्या हाताला काम मिळवून दिले. शेत सुखी तर राज्य सुखी या संकल्पनेतून शेतकऱ्यांना जाचक करातुन मुक्त केले होते. त्यांनी त्या काळी शाळा काढून विद्यार्थ्यासाठी अनमोल ग्रंथसंपदा निर्माण करून जतन केली होती. त्यांच्यामध्ये चरित्र, चातुर्य, संघटन, पराक्रम, युध्दनिती, राजस व सत्त्वगुण होते. स्वतःचे कौशल्य व प्रयत्नांची पराकाष्ठा करूनच राष्ट्रांचा विकास करावा असे त्यांचे विचार होते. कार्यक्रमाला महाविद्यालयातील रूपेश राऊत, डॉ. रोशन शिंदे, डॉ. प्रशांत काळे, डॉ. प्रतिक पुसदकर, डॉ. पि. के. प्रधान, एकनाथ भंकाळे, शुभम धार्मिक कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...