आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविधवा स्त्रियांना त्यांचा हक्क मिळण्याकरता अहिल्याबाईनी कायद्यात बदल करत विधवा महिलांना त्यांच्या पतीच्या संपत्तीत अधिकार मिळवून दिला व मुल दत्तक घेण्याचा हक्क देखील प्राप्त करून दिला. अहिल्या बाईंचे हृदय दया, परोपकार, निष्ठा या भावनांनी ओतप्रोत भरलेले होते, म्हणूनच करुणेची देवी,कुशल समाजसेविका या प्रतिमेने त्यांना ओळखलं जात होतं तसेच त्या महान समाजसुधारक व महिलांच्या सशक्तीकरणात त्यांचा सिंहाचा वाटा होता असे मत विद्यानिकेतन इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष डॉ संजय बंग यांनी व्यक्त केले. सर्वप्रथम पाहुण्यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. प्रास्ताविकपर भाषणात मुख्याध्यापक निवृत्ती ढोडरे यांनी अहिल्या बाईच्या स्त्री उद्धाराचे कार्य सांगितले व त्यांच्या जीवनाचा संघर्षमय प्रवास सांगितला. अहिल्याबाई होळकर या केवळ एक महान शासकच नव्हे तर पराक्रमी योद्धा आणि सर्वश्रुत अश्या धनुर्धर देखील होत्या. अनेक युद्धांमध्ये साहसी योध्याप्रमाणे विचारपूर्वक निर्णय घेत त्यांनी युद्धाचे नेतृत्व केले आणि विजय संपादन केला.शिवाय अहिल्याबाई अश्या शासकांमधून एक होत्या ज्या आपल्या प्रांताच्या रक्षणार्थ व अन्यायाविरुद्ध आक्रमण करण्यास कधीही मागेपुढे पाहत नसत. महाराणी अहिल्या बाईंची ओळख मावळ प्रांताच्या राजमाता म्हणून होती. त्यांच्यातील अद्भुत साहसाला आणि अदम्य प्रतिभावंत होत्या.अहिल्याबाई महिलांच्या सशक्तीकरणाच्या बाजूने होत्या. स्त्रियांची परिस्थिती बदलण्या करता त्यांनी बरेच प्रयत्न केलेत. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक नितीन राऊत,विलास राऊत, शिक्षक अमित वानखडे, निखिल निमकर, श्रीनिवास देशपांडे, अमोल वानखडे,दीपक कारानी, राजेश तळोकर, मंगल जाधव, अतीत इंगळे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले तर आभार प्रदर्शन हेमंत दुबे यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.