आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोहळा:अखंड हरिनाम सप्ताह; विठ्ठल नामाच्या‎ गजराने दुमदुमली कोटंबा नगरी‎

बाभूळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कोटंबा येथील श्री विठ्ठल‎ रुक्मिणी देवस्थान येथे दि. २४ ते ३१ मार्च पर्यंत श्रीमद् भागवत‎ कथा तसेच ज्ञानयज्ञ व अखंड हरिनाम सप्ताह आयोजित‎ करण्यात आला होता. यामध्ये सकाळी सहा वाजता पासून ते‎ रात्री दहा वाजेपर्यंत हरिनाम सागर भागवत कथा तसेच हरिपाठ‎ नियमित चालत असे. या कार्यक्रमाची सांगता शनिवार, दि. १‎ एप्रिल ला संत रामगिरी महाराजांच्या पालखी द्वारे झाली.‎ सकाळी निघालेली ही संत रामगिरी महाराजांची दिंडी‎ दुपारी साडेतीन वाजता विठ्ठल रुक्मिणी देवस्थान येथे‎ पोहोचली.

संपूर्ण गावकरी लोक हातात केरसुणी घेऊन संपूर्ण‎ गाव स्वच्छ करीत घरासमोर सुंदर रांगोळी चे रेखाटन काढून‎ घरांसमोर आंब्याचे पानाचे तोरण बांधून संपूर्ण गाव सजवला‎ होता. ही पालखी संपूर्ण गावातील लोकांच्या अंग नातून जात‎ असताना लोकं त्यांची पूजा करीत असे. अनेक ठिकाणी‎ नाश्ता चहापाणी मठ्ठा शरबत यांचं आयोजनही लोकांकडून‎ करण्यात आले होते. या पालखी सोहळ्यात गळवा येथील‎ भजनी मंडळ लोणी येथील भजनी मंडळ तसेच अनेक‎ विविध गावातून स्त्री व पुरुष आपापले भजनी मंडळ घेऊन‎ सहभागी झाले होते.‎