आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अक्षय्य तृतीया; घागरींचे भाव 25 टक्क्यांनी वाढले

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • माती अन् वाहतुकीचा खर्च वाढला; पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा परिणाम

अक्षय्य तृतीया अर्थात आखाजी या सणावर मागील वर्षी कोरोनाचे सावट होते. मात्र, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा माती अन् वाहतुकीचा खर्च वाढल्याने या सणासाठी लागणाऱ्या घागरींच्या दरात २५ टक्के वाढ झाली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मागील वर्षी लॉक डाऊनची अंमलबजावणी केली होती. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने प्रशासनाने सर्व निर्बंध हटवले. यामुळे प्रत्येक सण मोठ्या उत्साहात साजरे होत आहे. अक्षय्य तृतीयेला पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी घागर भरण्याची परंपरा आहे.

अक्षय्य तृतीयेला (आखाजी) मातीच्या घागरींचे विशेष महत्त्व आहे. अक्षय्य तृतीया आल्याने घागरींची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी शहरातील शहर पोलिस स्टेशन ते नेताजी चौकात घागरींची विक्री करण्यात येत आहे. तर काही व्यावसायिक ग्रामीण भागात जावून घागरीची विक्री करत आहे. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत घागरीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच घागरीचे भाव २५ टक्क्यांनी वाढले आहे. कुंभारांकडून शहरात जवळपास १० ते १२ हजार घागरी अक्षय्य तृतीयेला विकल्या जातात. मागील वर्षी घागरीचे दर ५० ते ६० रूपये होत तर यंदा घागरीचे दर ८० ते १०० रुपये आहेत.

बातम्या आणखी आहेत...