आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन‎:पात्र सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदार‎ नोंदणी करावी : जिल्हाधिकारी यांचे आवाहन‎

वाशीम‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती विभाग विधान परिषद पदवीधर‎ मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीत‎ आपला मतदानाचा हक्क बजावता यावा,‎ यासाठी जिल्ह्यातील सर्व अधिकारी आणि‎ त्यांच्या अधिनस्त असलेल्या सर्व पात्र‎ कर्मचाऱ्यांनी ७ नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी‎ करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी‎ षन्मुगराजन एस. यांनी केले.‎ पदवीधर मतदार नोंदणी कार्यक्रमाअंतर्गत‎ सर्व पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांची मतदार‎ नोंदणी करण्याच्या अनुषंगाने वाकाटक‎ सभागृहात जिल्हाधिकारी षण्मुगराजन यांच्या‎ अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात‎ आले.

यावेळी ते बोलत होते. सभेला जिल्हा‎ परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी‎ वसुमना पंत, उपजिल्हा निवडणूक‎ अधिकारी नितीन चव्हाण, जिल्हा नियोजन‎ अधिकारी राजेश सोनखासकर, जिल्हा‎ उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस. डी.‎ खंबायत, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख‎ शिवाजी भोसले, जिल्हा माहिती अधिकारी‎ विवेक खडसे, जिल्हा कौशल्य विकास व‎ रोजगार मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त‎ सुनंदा बजाज, जिल्हा क्रीडा अधिकारी लता‎ गुप्ता व जिल्हा कोषागार अधिकारी चंद्रकांत‎ खारोडे उपस्थित होते.‎

षण्मुगराजन म्हणाले, जिल्ह्यात आतापर्यंत‎ ४०९१ पदवीधरांनी मतदार नोंदणी केली आहे.‎ नोंदणी करण्याची सुविधा ऑनलाईन किंवा‎ ऑफलाईन आहे. ज्यांनी मतदार नोंदणीचे‎ अर्ज घेतले आहेत, त्यांनी ते अर्ज भरुन जमा‎ करावे. सर्व पात्र कर्मचाऱ्यांनी मतदार नोंदणी‎ केली आहे, त्यांनी याबाबत खात्री करावी.‎ तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयात‎ अर्ज भरुन सादर करावे. अधिकारी-‎ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी‎ ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज संबंधित‎ कार्यालयात आवश्यक कागदपत्रासह सादर‎ करावे, असे जिल्हाधिकारी षण्मुगराजन‎ यांनी सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...