आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यशाळा:राष्ट्र उभारणीसाठी तरुणांचा सर्वांगीण विकास आवश्यक; ​​​​​​​ सीएमसीएस मध्ये धर्मेंद्र पवार यांचे प्रतिपादन

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तरुण हाच खरा उज्ज्वल देशाचा आधार स्तंभ असतो. तरुणांमध्ये चारित्र्य निर्मिती, सर्वांगीण बौद्धिक विकास, मानसीक उन्नती नेतृत्वगुण कसा विकास होईल जेणेकरून ते राष्ट्र उभारणीसाठी उपयुक्त ठरेल या विषयी कार्यशाळेत विद्यार्थांना मार्गदर्शन करताना प्रमुख मार्गदर्शक धर्मेंद्र पवार यांनी मार्गदर्शन केले.

स्थानिक हरिकिसन जाजू एज्युकेशन संस्था संचालित कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड कॉम्प्युटर सायन्स येथे ‘मनुष्य निर्माणानातून राष्ट्राचे पुनरुत्थान’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन शनिवार, दि. ३ सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा यवतमाळचे धर्मेंद्र पवार, सतीश उपरे, योगेंद्र मारू, बजरंग राठी, पंकज वसानी हे लाभले होते.

या कार्यशाळेत विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी येथे २५, २६, व २७ डिसेंबर २०२३ रोजी होणाऱ्या विशेष शिबिरात सहभागी होण्याकरता घेण्यात येणाऱ्या प्रवेशिका परीक्षा बद्दल मार्गदर्शन केले. या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी गुणवत्ता यादी मध्ये येणार त्यांना कन्याकुमारी येथे आयोजित विनामूल्य शिबिरात सहभागी होण्याची संधी प्राप्त होईल असे विद्यार्थांना माहिती दिली. एक दिवसीय कार्यशाळा प्राचार्य रितेश चांडक यांच्या अध्यक्षतेखालील पार पडली. तर प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. अतुल शिंगरवाडे, आयक्यूएसी समन्वयक हे लाभले. ही कार्यशाळा महाविद्यालयाच्या स्पर्धात्मक परीक्षा आणि करिअर मार्गदर्शक सेल तर्फे घेण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. सुधीर वेळूकर तर आभार प्रदर्शन प्रा. सुनिल चिंते यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...