आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप:अतिवृष्टीच्या अनुदान वाटपात तफावत‎ असल्याचा आरोप; शेतकऱ्यांचा आक्रोश‎‎

घाटंजी‎ ‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अतिवृष्टी अनुदानापासून वंचित असलेल्या‎ शेतकऱ्यांनी मंगळवार, दि. एक नोव्हेंबर रोजी‎ तहसीलदारांना निवेदन दिले. शंभर टक्के मदत‎ मिळावी, अशी मागणी निवेदनातून केली.‎ ‎ जून, जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या‎ अतिवृष्टीमुळे खरिपातील ८० ते ९० टक्के‎ पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे‎ पंचनामे करुन भरपाई म्हणून १३ हजार ६००‎ रूपये प्रती हेक्टरी अतिवृष्टी अनुदान जाहीर‎ केले. ही मदत अत्यंत तोकडी आहे.‎

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत निधी‎ जमा झाला नाही. पिकाच्या नुकसानीचे‎ पंचनामे निश्चित करताना तलाठी, कृषी‎ सहाय्यक, ग्रामसेवकांवर दबाव टाकून चुकीचे‎ पंचनामे दाखवण्यात आल्याचा आरोप‎ शेतकऱ्यांचा आहे. गावातील सरपंच,‎ उपसरपंच, प्रतिष्ठित शेतकरी, नागरिकांशी‎ चर्चा करतांना ८० ते ९० टक्के नुकसान‎ झाल्याचे कबूल करुन तसे पंचनामे‎ प्रशासनाला सादर केले होते.

तालुक्यातील‎ शेतकऱ्यांच्या खात्यात केवळ ५० ते ५५ टक्के‎ अनुदान जमा होत आहे. त्याचप्रमाणे‎ तहसीलदारांनी नुकसान क्षेत्र अत्यल्प‎ दाखविले. परिणामी, पिक विमा स्वरुपात‎ मिळणारी रक्कमही अत्यल्प राहिल. सन‎ २०२१-२०२२ च्या अतिवृष्टीग्रस्तांना मिळणाऱ्या‎ अनुदानात मोठी तफावत आहे. त्यामुळे‎ शेतकऱ्यांत संताप व्यक्त केला जात आहे.‎ लवकरात लवकर न्याय न मिळाल्यास तीव्र‎ आंदोलन करुन उपोषणास बसण्याचा इशारा‎ निवेदनातून दिला आहे. कर्मचाऱ्यांच्या वादात‎ जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून‎ तोडगा काढावा, अन्यथा महसूल, कृषी‎ विभागातील कर्मचाऱ्यां विरोधात आंदोलन‎ करण्याचा इशारा दिला.

यावेळी अभिषेक‎ ठाकरे, आशिष लोणकर, संजय पाटील इंगळे,‎ डॉ. विजय कडू, संजय गोडे, माणिक मेश्राम,‎ सुनील देठे, किशोर दावडा, राजू मुनेश्वर,‎ यादवराव निकम, राज जाधव, संदीप बिबेकार‎ सह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.‎ पांढरकवडा, आर्णी तालुक्यात देखील १३‎ हजार ६०० रूपये प्रमाणे अनुदान मिळत आहे.‎ केवळ घाटंजी तहसीलदार, तालुका कृषी‎ अधिकाऱ्यांच्या व्देशपुर्ण भावनेमुळे काही‎ गावांमध्ये ५२ टक्के, तर काही ठिकाणी ५५५‎ टक्के असा निधी वाटप केला. अतिवृष्टीमुळे‎ खचलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ‎ चोळण्यासारखे आहे. एकंदरीतच तालुक्याला‎ कुणी वाली नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले‎

बातम्या आणखी आहेत...