आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:पतीसह नातेवाईकांचा आरोप; डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे झाला बाळंतिणीचा उपचारादरम्यान मृत्यू

यवतमाळ23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा शासकीय रुग्णालयात डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत पतीसह नातेवाइकांनी शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी धाव घेत तक्रार दिली. यावेळी संबंधीत दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. छाया कपिल चव्हाण वय २८ वर्ष रा. पळशी ता. आर्णी असे मृत महिलेचे नाव आहे.

आर्णी तालुक्यातील पळशी येथील कपिल चव्हाण याने सोमवारी पत्नी छाया हिला प्रसुतीकरीता यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. प्रसूती दरम्यान छाया हिने एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर तिची प्रकृती बिघडली, अशातच उपचारादरम्यान दि. ९ जूनला रात्रीच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. या मृत्यूस डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून शुक्रवारी यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. संबंधीत दोषी डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देखील करण्यात आली. यावेळी पती कपिल चव्हाण, त्याचबरोबर पांगरी येथील माजी सरपंच अश्वीन जाधव, शेकलगाव येथील उपसरपंच गजानन जाधव, अनिल जाधव, हितेश जाधव, सुरेश राठोड, राहुल राठोड, विनोद जाधव, नीलेश राठोड, यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

दोन डॉक्टरांच्या उपस्थितीत उत्तरीय तपासणी
डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप पतीने करीत शहर पोलिस ठाण्यात धडक दिली. यावेळी ठाणेदार नंदकुमार पंत यांनी दोन डॉक्टरांच्या उपस्थितीत उत्तरीय तपासणी करण्यात येईल, त्याचबरोबर अहवालात कुणी दोषी आढळल्यास पुढील कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर कुटुंबीय उत्तरीय तपासणी करीता रुग्णालयात दाखल झाले.

बातम्या आणखी आहेत...