आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांचे आदेश मंगळवार, दि. ११ एप्रिल रोजी निर्गमित झाले. यात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांसह वणी, राळेगाव आणि यवतमाळ उपविभागीय अधिकाऱ्यांचीसुद्धा बदली झाली आहे. तर रिक्त असलेल्या भूसंपादन, रस्ते प्रकल्प कार्यालयातील उपजिल्हाधिकाऱ्यांच्या पदावर बदलीतून अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. दरवर्षी एप्रिल, मे महिन्यात महसूल, जिल्हा परिषद प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू होते.
यंदा सर्वप्रथम महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निर्गमित झाले. यात निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांची वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे उपविभागीय अधिकारी पदी बदली झाली. तर यवतमाळ उपविभागीय अधिकारी अनिरूद्ध बक्षी यांची अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे बदली झाली. तर त्यांच्या जागेवर बुलढाणा येथून राजेश्वर हांडे येणार आहे. वणी उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांची अकोला येथे, तर त्यांच्या जागेवर मोर्शी येथील नितीनकुमार हिंगोले यांची नेमणूक करण्यात आली. राळेगाव उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांची बुलढाणा येथे उपविभागीय अधिकारी पदी नेमणूक करण्यात आली. त्यांच्या जागेवर सध्या कुणाचीही नेमणूक केली नाही.
विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यापासून रिक्त असलेल्या भूसंपादन, रस्ते प्रकल्प कार्यालयाच्या उपजिल्हाधिकारी पदी वाशिम येथील उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत यांची बदली करण्यात आली. सध्या यवतमाळ येथील निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून कुणाचीही नेमणूक करण्यात आली नाही, . लवकरच तहसीलदारांच्या होणार बदल्या जिल्ह्यातील काही तहसीलदारांच्यासुद्धा बदल्या येत्या काही दिवसांत होण्याची चिन्हे आहेत. जैसे थे परिस्थितीत राहण्यासाठी काही तहसीलदार लोकप्रतिनिधींचे दरवाज ठोठावत आहे. तर यवतमाळ तहसीलदार म्हणून रूजू होण्यासाठी काही जणांनी कंबर कसली आहे. यात सर्वांधिक चर्चा पालकमंत्र्यांच्या मतदार संघातील तहसीलदारांची सुरू आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.