आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेचे भजन कीर्तन आंदोलन:अमाना ते धरमवाडी रस्त्याच्या खंडीत कामामुळे ग्रामस्थांचे हाल

वाशीम25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या मालेगाव तालुक्यातील अमाना ते धरमवाडी रस्त्याचे काम खंडीत झाल्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत. सदर रस्त्याचे काम त्वरीत पूर्ण होण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष मनीष डांगे यांच्या मार्गदर्शनात व महिला सेना जिल्हाध्यक्ष सीता धंदरे यांच्या नेतृत्वात गुरुवार, ८ सप्टेंबर रोजी रस्त्यावर भजन कीर्तन आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात मनसे जनहित कक्षाच्या राज्य उपाध्यक्षा प्रा. संगीता चव्हाण, मालेगाव तालुकाध्यक्ष गजानन कुटे, वाशीम तालुकाध्यक्ष विठ्ठल राठोड, शेतकरी सेना तालुकाध्यक्ष रघुनाथ खुपसे, मालेगाव तालुका उपाध्यक्ष रामेश्वर वाघ, जनहित तालुकाध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण, महिला सेना तालुकाध्यक्ष वनिता पांडे, महेश देशपांडे, सुरेश चोंडकर, रवी साबळे, पंजाब गवळी, उमेश देवळे, शाखा अध्यक्ष उमेश गवळी, गजानन गवळी, गोपाल गवळी, रुपेश मगर, विठ्ठल देवरे, गोपाल भांदुर्गे, मोहन देशकर, गोपाळ गवळी, आकाश गवळी आदींसह महाराष्ट्र सैनिक व गावकरी सहभागी झाले होते. या आंदोलनाची दखल घेवून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकार्‍यांनी आंदोलनस्थळी मनसे पदाधिकार्‍यांची भेट घेवून खंडीत झालेले रस्त्याचे काम त्वरीत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यामुळे भजन कीर्तन आंदोलन थांबवण्यात आले. मात्र अधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासन न पाळल्यास कार्यकारी अभियंत्यांना साडीचोळी भेट देवून पुन्हा आंदोलन छेडणार असल्याचा इशारा मनीष डांगे यांनी दिला. आंदोलनादरम्यान जऊळकाचे ठाणेदार मोरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता.

बातम्या आणखी आहेत...