आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्याधिकाऱ्यांविना न.पं.:कळंब नगराध्यक्षांच्या टेबलवर संतप्त‎ नगरसेविकेने टाकला कचऱ्याचा ढिगारा‎

‎कळंब‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळंब‎ येथील नगरपंचायतला प्रशासकीय ‎ ‎ मुख्याधिकारीच नसल्याने नगरसेवक सत्तेतील नगरसेवकांचे वाभाडे काढत ‎ असल्याचे दिसते. कुणी कुणाचा वाली ‎ ‎ नसल्याने कळंब शहरातील नगरसेवक‎ सैराट झाले असून नवरात्र उत्सवात‎ कळंब (माथा) वस्तीमध्ये साफसफाई न ‎ केल्याने नागरिकांच्या रोषाला बळी पडून ‎प्रभाग क्रमांक ९ मधील नगरसेविका ‎जहिराबोनो मोहम्मद शफी यांनी दि. ४ ‎ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी नगराध्यक्ष ‎ अफरोज बेगम फारुख अहेमद सिद्दिकी यांच्या कक्षात असलेल्या टेबलवर‎ कचऱ्याचा ढिगाराच नेऊन टाकला.‎ प्राप्त माहिती नुसार येथील कळंब‎ (माथा) वस्ती व बाभूळगाव रोडवरील‎ विश्वनाथ कॉलनी, ठाकरे ले आऊट‎ मधिल नागरिकांनी शारदीय नवरात्री‎ उत्सवा निमित्त परिसरातील कचरा‎ उचलून साफसफाई करण्यात यावी‎ म्हणून पंधरा दिवसापूर्वी नगरपंचायतला‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ निवेदन दिले होते.

मात्र नवरात्री उत्सव‎ संपण्याच्या मार्गावर आले असताना‎ तसेच शहरातील महिला, पुरुष रात्रीच्या‎ वेळात दुर्गा देवीच्या दर्शनाला येत असून‎ दि. ५ ऑक्टोबर रोजी विजयादशमी‎ असुन सुद्धा नगरपंचायतने रोडच्या‎ बाजुचे कचऱ्याचे ढिगारे उचलले‎‎ नसल्याचे प्रभाग क्रमांक ९ च्या‎ नगरसेविका जहिराबानो मोहंमद शफी‎ यांनी बोलताना सांगितले. तर कळंब‎ नगरपंचायतचे मुख्याधिकारी परळकर‎ यांची बदली झाल्यानंतर बाभूळगाव‎ येथील मुख्याधिकारी महेश पाटील‎ जामनोर यांचेकडे प्रभार देण्यात आला‎ होता. त्यांचीही उमरखेड येथे बदली‎ झाल्याने कळंबची नगरपंचायत‎ मुख्याधिकाऱ्यांविना पोरकी झाली असून‎ सत्तेतील पदाधिकारी सैराट झाले आहे.‎ त्यांना नागरिकांच्या सण, उत्सवाचे काही‎ देणे घेणे नाही.

त्यामुळेच नागरिकांच्या‎ समस्येकडे कुणी लक्ष द्यायला तयार‎ नाही. २ कोटी ८० लाख रुपयाचा राधा‎ माधव सामाजिक संस्थेला शहरातील‎ कचरा उचलण्याचा कंत्राट आहे. मात्र‎ त्या कंत्राटदारांपुढे कुणीच बोलत नाही.‎ तर प्रभागातील नागरीक साफसफाई न‎ केल्यास घरावर येतात, शिविगाळ‎ करतात, मतदान मागाले आला आणि‎ कचरा कोण साफ करेल म्हणून बोलतात.‎ त्यातच विजयादशमी तोंडावर येवुनही‎ नगरपंचायत कंत्राटदाराने कचरा उचलला‎ नसल्याने दि. ४ ऑक्टोबर रोजी‎ नगरपंचायत नगराध्यक्षाच्या टेबलवर‎ रस्त्यावरचा कचरा जमा करुन नेऊन‎ टाकला असल्याचे समिर शेख यांनी‎ सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...